ज्येष्ठ नागरिकाच्या मारेकऱ्याला पोलीस कोठडी

By Admin | Updated: September 21, 2015 14:46 IST2015-09-21T04:11:07+5:302015-09-21T14:46:00+5:30

घरामध्ये एकट्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा खून करून १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्याला न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

Police cell murdered for killing senior citizen | ज्येष्ठ नागरिकाच्या मारेकऱ्याला पोलीस कोठडी

ज्येष्ठ नागरिकाच्या मारेकऱ्याला पोलीस कोठडी

पुणे : घरामध्ये एकट्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा खून करून १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्याला न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने त्याला अटक केली आहे. चोरीच्या उद्देशाने हा खून करण्यात आला असून, आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील इलाहाबादचा रहिवासी आहे.
राहुल जुग्गुलाल विश्वकर्मा (वय २०, रा. सम्राट चौक, विमाननगर) असे आरोपीचे नाव आहे. सतीशचंद्र गोपाळराव द्रविड (वय ८६, रा. व्हेलेनशिया सोसायटी, विमाननगर) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी स्वाती द्रविड (वय ५१, रा. विमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे. घरामध्ये एकट्या असलेल्या सतीशचंद्र यांच्या गळ्यावर चाकूने वार करून आरोपीने त्यांचा खून केला. त्यानंतर कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड, असा एकूण १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केला होता. त्याच्या पायातील स्लिपरचा छाप घटनास्थळावर उमटला होता. पुढील तपास करण्यासाठी सरकारी वकिलांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची केलेली मागणी न्यायालयाने ती मंजूर केली. (प्रतिनिधी)

Web Title: Police cell murdered for killing senior citizen