पोलिसांनी अंधार करून केली MPSCच्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची धरपकड, गोपीचंद पडळकरही ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 10:09 PM2021-03-11T22:09:33+5:302021-03-11T22:09:45+5:30

आज दुपार पासूनच विद्यार्थी आंदोलन करत होते. एमपीएस्सीची परिक्षा रद्द का केली, असा सवाल विचारत या विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. 

Police arrested the protesting students of MPSC in the dark, Gopichand Padalkar also in custody | पोलिसांनी अंधार करून केली MPSCच्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची धरपकड, गोपीचंद पडळकरही ताब्यात

पोलिसांनी अंधार करून केली MPSCच्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची धरपकड, गोपीचंद पडळकरही ताब्यात

Next
ठळक मुद्देआज दुपार पासूनच विद्यार्थी आंदोलन करत होते.एमपीएससीची परिक्षा रद्द का केली, असा सवाल विचारत या विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. आज रात्री ८:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हर्च्यूअल संवाद साधून, उद्या परिक्षेची तारीख जाहीर केली जाईल, असे सांगितले आहे.

पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने  अचानकपणे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आज संतप्त होऊन रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्ध्यांनी शहरात तीव्र आंदोलन केले. यादरम्यान पोलिसांनी अंधार करून (लाईट घालवून) या आंदोलक विद्यार्थ्यांची धरपकड केल्याची घटना घडली आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Police arrested the protesting students of MPSC in the dark, Gopichand Padalkar also in custody)

आज दुपार पासूनच विद्यार्थी आंदोलन करत होते. एमपीएससीची परिक्षा रद्द का केली, असा सवाल विचारत या विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. 

Uddhav Thackeray on MPSC Exam: येत्या आठवडाभरात MPSC परीक्षा घेणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

यासंदर्भात, आज रात्री ८:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हर्च्यूअल संवाद साधून, उद्या परिक्षेची तारीख जाहीर केली जाईल, असे सांगितले. मात्र, तारीख जाहीर होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भुमिका या विद्यार्थ्यांनी घेतली होती. 

यासंदर्भात, आज रात्री ८:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हर्च्यूअल संवाद साधत, उद्या परिक्षेची तारीख जाहीर केली जाईल, असे सांगितले. मात्र, तारीख जाहीर होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भुमिका या विद्यार्थ्यांनी घेतली होती. यानंतर अखेर येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी परिसरातील लाईट घालवली आणि सर्व आंदोलकांची धरपकड सुरु केली. यावेळी गोपींचंद पडळकर, विक्रांत पाटिल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी, सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप पडळकरांनी केला.

'एमपीएससी' करणं सोपं नाही रे भाऊ; त्यामागं आहे कडवा संघर्ष..!




याशिवाय परीक्षा पुढे ढकलल्यामुळे राज्यातील नाशिक, कोल्हापूर, वर्धा आदी शहरांतही विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले. 

Web Title: Police arrested the protesting students of MPSC in the dark, Gopichand Padalkar also in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.