पुणे: पुणे महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ च्या निकालांमध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. प्रभाग क्रमांक ९ (बाणेर-बालेवाडी) मध्ये सर्वात चर्चेची ठरलेली 'ड' जागेची लढत अमोल बालवडकर यांनी जिंकली आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत अमोल बालवडकर यांनी प्रतिस्पधी उमेदवाराचा अवघ्या ९०३ मतांनी पराभव केला.
प्रभाग ९-ड मध्ये अमोल रतन बालवडकर यांना ३५,६०४ मते मिळाली, तर त्यांचे निकटतम प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार लहू गजानन बालवडकर यांना ३४,७०१ मतांवर समाधान मानावे लागले. याच प्रभागात 'ब' जागेवरून बाबुराव चांदेरे (२८,५४० मते) आणि 'अ' जागेवरून रोहिणी सुधीर चिमटे (४१,९४६ मते) यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
भाजपने तिकीट नाकारल्यानंतर राष्ट्रवादीत (अजित पवार गट) गेलेल्या अमोल बालवडकर यांनी भाजपचे लहू बालवडकर यांच्यावर ५१० मतांची निसटती पण महत्त्वाची आघाडी घेतली आहे. चंद्रकांत पाटील यांनी लहू बालवडकर हे राज्यात सर्वाधिक मतांनी जिंकतील असा दावा केला होता, त्यामुळे अमोल बालवडकरांसाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरली होती.
बालवडकर यांच्या प्रभागातील निकाल...
प्रभाग क्रमांक:-9
नववी अंतिम फेरी
अरोहिणी सुधीर चिमटे :- 41946गायत्री मोहन मेढे ( कोकाटे ) :-32670नगरघणकर रोशनी बबन :- 2849
बगणेश न्यानोबा कळमकर :- 27129बाबुराव चांदेरे :- 28540 (राष्ट्रवादी विजयी)संदीप धारू बालवडकर :- 2416जयेश संजय मुरकुटे :- 7974प्रमोद नामदेव निम्हण :- 16082किरण लक्ष्मण रायकर :- 209
कमयुरी राहुल कोकाटे :- 34154ज्योति नितीन चांदेरे :- 7024पार्वती अजय निम्हण :- 23929पुनम विशाल विधाते :- 15522
डजीवन निवृत्ती चाकनकर :- 3326सुदर्शन नाशिकराव जगदाळे :- 1122अमोल रतन बालवडकर :- 35604लहू गजानन बालवडकर :- 34701मयूर तुळशीराम भांडे :- 1596मयूर भगवान सुतार :- 3454रितेश राहुल निकाळजे :- 246नितीन विश्वनाथ पायगुडे :- 233महेश भिमराव सुतार :- 310
Web Summary : Amol Balwadkar of NCP won Pune's Ward 9-D by 903 votes. Despite BJP denying ticket, he defeated BJP's Lahu Balwadkar. Chandere and Chimte also secured victories from Ward 9.
Web Summary : अमोल बालवडकर (एनसीपी) ने पुणे के वार्ड 9-डी में 903 वोटों से जीत हासिल की। बीजेपी द्वारा टिकट न दिए जाने के बावजूद, उन्होंने बीजेपी के लहू बालवडकर को हराया। चांदेरे और चिमटे ने भी वार्ड 9 से जीत हासिल की।