PM Modi In Pune | 'पुण्याचा मेट्रो प्रकल्प काँग्रेसने आणला, भाजप श्रेय घेतंय'; मोदींच्या दौऱ्याचा काँग्रेसकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 10:58 IST2022-03-06T10:19:45+5:302022-03-06T10:58:16+5:30
पंतप्रधान मोदी संसदेत खोटे बोलतात- काँग्रेस

PM Modi In Pune | 'पुण्याचा मेट्रो प्रकल्प काँग्रेसने आणला, भाजप श्रेय घेतंय'; मोदींच्या दौऱ्याचा काँग्रेसकडून निषेध
पुणे : 'नरेंद्र मोदी गो बॅक' अशा घोषणा देत पुणेकाँग्रेसने पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याचा निषेध केला आहे. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनी (pm narendra modi) संसदेत महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पुण्यातील अलका टॉकीज जवळील चौकात काँग्रेसने निषेध केला. माजी खासदार सुरेश कलमाडी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे पुण्यात मेट्रो आली पण त्याचे श्रेय आता भाजप घेतंय, असंही काँग्रेसकडून सांगण्यात आले. (pune congress agitation narendra modi pune visit pune metro)
आपले पंतप्रधान भाजपचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत. पंतप्रधान संसदेत खोटे बोलतायेत. मेट्रोचा प्रकल्प अर्धवट असताना मेट्रोचे उद्घाटन केले जात आहे. मोदी हा खोटे बोलणारा व्यक्ती आहे. पंतप्रधान नागरिकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे शहराध्याक्ष रमेश बागवे यांनी केला.
ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत तिथून फक्त दोनशे मीटर अंतरावर काँग्रेसचे हे आंदोलन सुरू आहे. काँग्रेसच्या कामाचे श्रेय भाजपकडून घेतले जात असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.