शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

corona virus ; पिरंगुटगाव क्वारंटाईन ; पहिला कोरोना पॉझिटीव्ह आढळला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 7:21 PM

कोरोना विषाणूचा पॉझिटिव्ह रुग्ण हा  मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे आढळून आल्याने संपुर्ण मुळशी तालुक्यासह प्रशासन ही हादरून गेले आहे.या पॉझिटिव्ह रुग्णामुळे ग्रामीण भागातही आता नागरिकांच्या चिंतेची घरघर वाढली आहे

पिरंगुट : कोरोना विषाणूचा पॉझिटिव्ह रुग्ण हा  मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे आढळून आल्याने संपुर्ण मुळशी तालुक्यासह प्रशासन ही हादरून गेले आहे.या पॉझिटिव्ह रुग्णामुळे ग्रामीण भागातही आता नागरिकांच्या चिंतेची घरघर वाढली आहेपिरंगुट येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला असल्याची माहिती मुळशी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अजित करंजकर यांनी दिल्या नंतर या ठिकाणी प्रशासनाने तत्काळ धाव घेत पुढील कार्यवाही करण्यास सुरूवात केली असून खबरदारी म्हणून संपुर्ण पिरंगुट गाव हे लगेचच क्वारंटाईन केले आहे.पिरंगुट येथील एका ३६ वर्षीय महिलेमध्ये कोरोना पॉझिटिव्हची लक्षणे आढळून आली असून प्रशासनाकडून मिळालेल्या माहिती नुसार ही व्यक्ती आजारी असल्याने एका खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल झाल्या होत्या.तेव्हा त्या महिला एक दिवस या दवाखान्यामध्ये अ‍ॅडमिट सुद्धा होत्या. डॉक्टरांना रुग्णांविषयी शंका आल्यानंतर त्यांची पुणे येथील नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोना टेस्ट करण्यासाठी त्यांना पाठविले असता त्या ठिकाणी त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली. या घटनेची वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरताच संपुर्ण पिरंगुट गावासह संपुर्ण मुळशी तालुकामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

 सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या महिला खाजगी दवाखान्यामध्ये  एक दिवस अ‍ॅडमीट होत्या. तेव्हा या एक दिवसांमध्ये या दवाखान्यामध्ये कोण कोण आले होते तसेच किती रुग्ण आले व गेले याची संपूर्ण माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.या सर्व प्रकरणानंतर खबरदारी म्हणून प्रशासनाच्या वतीने संपुर्ण पिरंगुट गाव क्वॉरंटाईन करून या गावाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून संपूर्ण पिरंगुट गावामध्ये निर्जंतुक  फवारणी सुरू केली असून प्रशासनाच्या वतीने पिरंगुट मधील प्रत्येक कुटुंबांचा सर्व्हे सुरु केलेला आहे अशी माहिती गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी दिली.या सर्व प्रकरणाची माहिती मिळताच मुळशी तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण,गटविकास अधिकारी संदीप जठार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अजित करंजकर यांनी पिरंगुट येथे धाव घेतली. तेव्हा या ठिकाणच्या अजून दोन व्यक्तीची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांचे ही रिपोर्ट लवकरच मिळणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :pirangutपिरंगुटcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या