शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये सायकली पुन्हा लागल्या धावू

By admin | Updated: September 27, 2016 04:26 IST

सायकलींचे शहर अशी एके काळची पुण्याची ओळख काळाच्या ओघात पुसली गेली. चारचाकी, दुचाकींची संख्या इतकी वाढली, की सायकलचे दर्शन दुर्मिळ होत गेले.

- संजय माने, पिंपरी

सायकलींचे शहर अशी एके काळची पुण्याची ओळख काळाच्या ओघात पुसली गेली. चारचाकी, दुचाकींची संख्या इतकी वाढली, की सायकलचे दर्शन दुर्मिळ होत गेले. व्यायाम, तसेच निसर्गभ्रमंतीची आवड असलेल्यांनी शारीरिक तंदुरुस्तीसाठी नित्यनियमाने सायकल चालविण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये सायकली दिसू लागल्या आहेत.सायकलप्रेमींचे व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार होऊ लागले असून, सायकलिंग हा उत्तम व्यायाम असल्याचे मनोेमन पटलेल्यांच्या सायकली रोज सकाळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर धावू लागल्या आहेत. रोज सकाळी शुद्ध हवेत जॉगिंंगसाठी येणारे, तसेच तरण तलावात पोहणारे, निवांत ठिकाणी बसून योग करणाऱ्यांनी व्यायामाची आवड जपण्यासाठी सायकल वापरण्याचा संकल्प केला. रोज किमान दोन किलोमीटर तरी सायकल चालवायची, असा निश्चय त्यांनी केला. अगदी पाच वर्षांच्या बालकापासून ६० वर्षांच्या वृद्धांनी सायकलिंगला प्राधान्य दिले. सुरुवातीला सात जणांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या उपक्रमास प्रतिसाद वाढत गेला. सकाळी शुद्ध हवेत निगडीतील दुर्गादेवी टेकडीवर फेरफटका मारण्यासाठी आल्यानंतर ओळख झालेल्या सात ते आठ जणांनी सायकल चालविण्याचा व्यायाम करायचे ठरवले. सायकलचा वापर व्यायाम तंदुरुस्तीसाठी उपयुक्त ठरणारा आहे; एवढेच नाही, तर सायकल वापराने पर्यावरण संतुलनास मदत होते. प्रदूषण नियंत्रणासाठी सायकलचा अधिकाधिक वापर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हे पटवून देण्यासाठी या सायकलप्रेमींच्या ग्रुपने पुढाकार घेतला आहे. सकाळी उठल्यानंतर दूध आणण्यासाठी अथवा अन्य किरकोळ कामांकरिता दुचाकीचा वापर केला जातोे. दुचाकीचा वापर टाळून सायकल वापरण्यास प्राधान्य दिले आहे.सायकलप्रेमींचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपपिंपरी-चिंचवडमध्ये स्थापन झालेल्या ग्रुपने आतापर्यंत अष्टविनायक, तसेच लोहगड या ठिकाणी सायकल दौरे केले आहेत. महिन्यातून एकदा दूर अंतरावरचा सायकल दौरा काढल्यानंतर त्या मार्गावर येणाऱ्या शाळा, ग्रामपंचायत या ठिकाणी सायकलप्रेमींचा हा ग्रुप सायकल आणि पर्यावरणाचे महत्त्व पटवून देतो. पहाटे सहा ते नऊ या कालावधीत विविध वयोगटांतील सायकलस्वार आणि स्केटिंग करणारी मुले यांनीच स्पाइन रस्ता भरलेला दिसून येतो. दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ सुरू होण्यापूर्वी स्पाइन रस्ता हा जणूकाही सायकल आणि स्केटिंग ट्रॅक असल्याचे चित्र पहावयास मिळते. अनोखा संकल्पअधिकाधिक लोकांनी सायकल वापरास प्राधान्य द्यावे, यासाठी सायकलप्रेमींचा हा ग्रुप जोमाने काम करू लागला आहे. पिंपरी-चिंचवडमधील सुनील पाटील, सुनील ननावरे, संतोष गाडवे, राजू भापकर, बापू शिंदे, अभिजीत स्वामी, डॉ. नीलेश लोंढे, मोहन कर्पे यांनी सायकल वापराचा संकल्प करून सायकलप्रेमींची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे.