शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

हर घर झेंडा उपक्रमात महात्मा गांधी, नेहरू यांचे फोटो कुठेच दिसत नाहीत; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 12:40 IST

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हर घर तिरंगा उपक्रम

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमात झेंड्याचा सन्मान झालाच पाहिजे. पण सरदार पटेल, महात्मा गांधी, नेहरू असे अनेक जण आहेत. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्व बलिदान दिले पण त्यांचे फोटो कुठेच दिसत नसल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

पटोले म्हणाले, मोदी यांनी हर घर झेंडा हा उपक्रम राबवला आहे. झेंड्याचा सन्मान झालाच पाहिजे पण सरदार पटेल, महात्मा गांधी, नेहरू असे अनेक जण आहेत. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्व बलिदान दिले पण त्यांचे फोटो कुठेच दिसत नाही. नाईक यांचा विचार जर यातून त्यांनी पोहचवला असता तर अजून आनंद झाला असता. फाळणी बद्दल चित्रिफिती दाखवण्याचा निर्णय जो सरकार ने घेतला आहे. या विषयी हिंदू सभा आणि मुस्लीम लीग चे मोठे योगदान आहे. मुस्लीम लीग आणि हिंदू महासभा यांनी देशाला आग लावली. त्यावेळी हे दोघे ही एकत्र होते या दोघांमध्ये फाळणी झाली हे लोकांच्या समोर आले पाहिजे.  

अमित शहा यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे

चीन मधून असे झेंडे तयार हून येत असतील. तर मोदी, अमित शहा यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण तिरंग्याचा अपमान होऊ नये. आमची ओळख या ध्वजापासून सुरू होते. हा अपमान सरत्याने केला जातो आहे. हे काम जर भारतीय कामगारांना दिला असता तर त्यांना रोजगार मिळाला असता. आता त्यांना देशाला लुटायचे आहे जसे महाराष्ट्राचे सरकार लोकांना लुटून गुजरात ला फायदा करून देते आहे. पहिल्या कॅबिनेट मध्ये त्यांनी बुलेट ट्रेन ला मंजूर दिली पण शेतकऱ्यांना एक ही मदत नाही असेही पटोले यावेळी म्हणाले आहेत 

शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तिरंग्याचा मुद्दा आम्ही सरकारला प्रश्न विचारणार  मुख्यमंत्री २० तास कोणासाठी काम करत आहेत हे बघायला पाहिजे. आम्ही रात्री १ वाजेपर्यंत काम करतो. काही लोकांना झोप लागत नसेल. आम्ही जनतेच्या हितासाठी काम करतो आहे. अतिवृष्टी जिथे झाली तिथे मदत नाही मिळाली. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तिरंग्याचा मुद्दा याबद्दल आम्ही सरकारला प्रश्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाIndependence Dayस्वातंत्र्य दिन