शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

एचपीसीएलमधून पेट्रोल चोरी

By admin | Updated: October 10, 2016 02:10 IST

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉपोर्रेशन लिमिटेडच्या लोणी काळभोर टर्मिनलच्या लोणी काळभोर ते सोलापूर (पाकणी) येथे पेट्रोलियम पदार्थ वाहून

लोणी काळभोर : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉपोर्रेशन लिमिटेडच्या लोणी काळभोर टर्मिनलच्या लोणी काळभोर ते सोलापूर (पाकणी) येथे पेट्रोलियम पदार्थ वाहून नेणाऱ्या पाइपलाइनवर चोरट्यांनी व्हॉल्व्ह लावून चोरीचा प्रयत्न केला. हा प्रकार शनिवारी (दि. ८) सकाळी उघडकीस आला असून या ठिकाणावरून किती लिटर पेट्रोल, डिझेल, रॉकेलची चोरी झाली, याबाबत नक्की माहिती मिळवण्याबाबत आज सकाळपर्यंत एचपीसीएलचे पदाधिकारी असमर्थ होते.या चोरीसंदर्भात हिंदुस्थान पेट्रोलियम कॉपोर्रेशन लिमिटेड मुंबईच्या पुणे - सोलापूर पेट्रोल पाइपलाइनच्या लोणी काळभोर येथील परिचालन अधिकारी मयूरी महादेव शहाणे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ - ३० वाजण्याच्या सुमारास लाइन वॉकर देविदास रामचंद्र कामठे (रा. लोणी काळभोर) हे लाइन वॉकिंग करीत असताना त्यांना लोणी काळभोर गावच्या रूपनरवस्तीनजीक पाइपलाइन चॅनल १६७.५ येथे पेट्रोलचा वास व हवेचा आवाज आल्याने त्यांनी ही बाब सुपरवायझर भरत बबन कामथे (रा. सासवड, ता. पुरंदर) यांना कळवली. त्यांनी तत्काळ पुणे व सोलापूर येथील कंट्रोलरूमशी संपर्क साधला. कंट्रोलरूमच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ प्रबंधक रघुपती व अमित निमदेव यांना कळवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मयूरी शहाणे यांनी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पाइपलाइन बंद केली.त्यानंतर सर्व पदाधिकारी पाइपलाइन फुटलेल्या ठिकाणी पोहोचले. येथे पाहणी केली असता त्यांना सुमारे दोन फूट खोलीचा खड्डा आढळून आला. तेथून जात असलेल्या पाइपलाइनवर एक व्हॉल्व्ह लावलेला तसेच खड्ड्यांत पेट्रोल साचलेले दिसले. तेव्हा या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणच्या पाइपलाइनचेनुकसान करून कोणीतरी पेट्रोलची चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची खात्री पटल्याने शहाणे यांनी भा.दं.वि.क. ३७९, ५११ व सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीस प्रतिबंध कायदा कलम ३, पेट्रोलियम व मिनरल पाइपलाइन अ‍ॅक्ट १९६२ चे कलम ३ (४), १५ (२) अन्वये फिर्याद दिली आहे.अहोरात्र गस्त तरीही चोरी : कंपनीच्या कोणाचा हात असणार?पेट्रोल, डिझेल, रॉकेलची वाहतूक करीत असलेल्या या पाइपलाइनच्या देखरेखीसाठी जागोजागी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली असून ते अहोरात्र गस्त घालत असतात. तसेच यांमधून होणारे पेट्रोलियम पदार्थाचे वहन हे संगणक प्रणालीला जोडलेले असते. या पाइपलाइनवर कोणी होल पाडून चोरी करण्याचा प्रयत्न केला तर टर्मिनलमधील संगणक प्रणाली त्वरित हे ठिकाण दर्शवते. असे असताना हे चोरीचे प्रकार होतात कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुरक्षारक्षकांची नेहमीप्रमाणे गस्त होती. या पाइपलाइनमधून कोणत्या वेळी कोणता पेट्रोलियम पदार्थाचे वहन होणार व बंद कधी होणार, याची माहिती असते. तसेच या पाइपलाइनवर व्हॉल्व्ह बसवणे हे कोणा ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. या सर्व बाबींचा विचार केला तर या प्रकरणांत कंपनीचा एखादा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.