शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वारजे जलकेंद्राच्या निविदेत स्थायीची ‘चेन्नई’ एक्सप्रेस

By admin | Updated: July 17, 2014 03:10 IST

वारजे येथील जलशुध्दीकरण केंद्राची देखभाल व दुरुस्तीची निविदा भरताना चेन्नई येथील एका कंपनीने महापालिकेच्या नियम व अटींची पुर्तता केली नाही.

पुणे : वारजे येथील जलशुध्दीकरण केंद्राची देखभाल व दुरुस्तीची निविदा भरताना चेन्नई येथील एका कंपनीने महापालिकेच्या नियम व अटींची पुर्तता केली नाही. त्यामुळे महापालिकेच्या दक्षता विभागाने ही निविदा रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यानंतरही पाणी पुरवठा विभागाने ही निविदा स्थायी समितीपुढे ऐनवेळी आणून मंगळवारी मान्य करून घेतली. त्यामुळे वारजे जलकेंद्राची ‘चेन्नई’ एक्सप्रेस स्थायी समितीत सुसाट धावली. वारजे येथील जलशुध्दीकरण केंद्र दैनंदिन देखभाल दुरुस्तीसाठी ३ वर्षे चालविण्याची निविदा काढण्यात आली होती. पाणी पुरवठा विभागाने काढलेल्या निविदेनुसार चेन्नई येथील व्ही. एस़ टेक वबांग व समर्थ इंजिनिअर्स अ‍ॅड कॉन्ट्रॅक्टर्स या दोन निविदा आॅनलाईन आल्या होत्या. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी निविदाचे ‘अ’ पाकीट २१ डिसेंबर २०१३ ला उघडण्यात आले. त्यावेळी चेन्नईच्या कंपनीची महापालिकेतील नोंदणी मुदत २ जुलै २०१३ ला संपल्याचे निदर्शनास आले. आॅनलाईन निविदा सादर केल्यानंतर पुन्हा कोणतेही कागदपत्रे सादर करता येत नाहीत. त्यामुळे दक्षता विभागाने ही निविदा रद्द करण्याची शिफारस केली. दरम्यान, पाणी पुरवठा विभागातील काही अधिका-यांच्या आशिर्वादाने ऐनवेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोंदणीचे प्रमाणपत्र निविदेत घुसविण्यात आले. त्यानंतर ही कंपनी पात्र होणार असल्याचे ग्रहित धरून ‘ब’ पाकीट जानेवारी २०१४ ला उघडण्यात आले. त्यानंतरच्या काळात संबंधित कंपनीला महापालिकेत नव्याने नोंदणी करण्याची ६ महिने मुभा देण्यात आली. त्यानुसार व्ही. एस़ टेक वबांग कंपनीने २७ जूनला महापालिकेची नोंदणी मिळविली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त कार्यालयाच्या शिफारशीनुसार स्थायी समितीपुढे हा विषय मंगळवारी ठेवण्यात आला. त्यावर स्थायी समिती सदस्यांनीही त्याविषयीची सविस्तर माहिती न घेता निविदा तातडीने मान्य केली. परंतु, एका कंपनीसाठी महापालिका प्रशासनाने ऐनवेळी चक्रे फिरवून केलेल्या ‘चेन्नई’ एक्सप्रेसची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात जोरात सुरू आहे. (प्रतिनिधी)