इंदापूरची जनता कधी कोणाची विकेट काढेल सांगता येत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:12 IST2021-02-05T05:12:24+5:302021-02-05T05:12:24+5:30

इंदापूर शहरात कै. अजित ढवळे फाउंडेशन व श्रीनाथ क्रिकेट क्लबच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ...

The people of Indapur can't say who will take the wicket! | इंदापूरची जनता कधी कोणाची विकेट काढेल सांगता येत नाही!

इंदापूरची जनता कधी कोणाची विकेट काढेल सांगता येत नाही!

इंदापूर शहरात कै. अजित ढवळे फाउंडेशन व श्रीनाथ क्रिकेट क्लबच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहाराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, नगरसेवक अनिकेत वाघ, अमर गाडे, पोपट शिंदे, वसीम बागवान आदी उपस्थित होते.

दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील जनता खूप हुशार असून, जनतेला गोलंदाजी आणि फलंदाजी चांगलीच जमते आहे. त्यामुळे विरोधकांनी भ्रमात राहू नये. जनतेला विकासकामे करणारे आणि विकास कामांना अडथळा आणणारे कोण आहेत हे चांगले लक्षात येते. तरुणांनी क्रिकेट खेळाबसरोबरच समाजसेवा करण्यावर भर द्यावा, असाही सल्ला दिला.

तुफान फटकेबाजी!

क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर भरणे यांनी स्वत: फलंदाजी करण्यास सुरुवात केली. यामुळे मैदानात असणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्यानंतर खेळाला सुरुवात होताच भरणे यांनी तुफान फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या खेळामुळे उपस्थितांची मने जिंकली.

२९ इंदापूर भरणे

इंदापूर येथे क्रिकेट मैदानात फटकेबाजी करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व इतर.

Web Title: The people of Indapur can't say who will take the wicket!