Daund Accident: पायी जाणाऱ्या मायलेकाला चारचाकीची जोरदार धडक; नियमबाह्य वाहन चालवून चालकाने घेतला दोघांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:25 IST2025-12-10T17:25:08+5:302025-12-10T17:25:34+5:30
Daund Accident: पुणे-सोलापूर महामार्गाच्या लगतच्या सर्व्हिस रोडवरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या या भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने माय-लेकांना समोरून धडक दिली

Daund Accident: पायी जाणाऱ्या मायलेकाला चारचाकीची जोरदार धडक; नियमबाह्य वाहन चालवून चालकाने घेतला दोघांचा बळी
दौंड : खडकी (ता. दौंड) येथे माय और लेकराचा अपघातीमृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रूपाबाई सीताराम सावंत (वय ३८) आणि तिचा मुलगा संग्राम सीताराम सावंत (वय ११), दोघेही खडकी, ता. दौंड येथे राहणारे, या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गाच्या लगतच्या सर्व्हिस रोडवरून दुपारी साडेबाराशी वाजण्याच्या सुमारास दोघेही माय-लेक पायी चालत होते. यावेळी पुण्याच्या दिशेने येणाऱ्या (एमएच १२ एक्सक्यू ०२०१) या भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने नियमबाह्य पद्धतीने वाहन चालवून माय-लेकांना समोरून धडक दिली. अपघाताचे स्वरूप भीषण होते की, मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिक धावून गेले. झालेल्या अपघातात दोन्ही गंभीर जखमी झाले आणि पुढे त्यांच्या मृत्यूची नोंद झाली. यावेळी वाहन चालक पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नियमबाह्य पद्धतीने चालवले वाहन
सर्व्हिस रोडवरून असंख्य वाहने नियमांचे उल्लंघन करून वाहने चालवताना दिसत आहेत. या घटनेतही चालकाने सर्रास नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. माय लेक हे पायी रस्ता क्रॉस करताना समोरून या वाहनाने दोघांना जोरदार धडक दिली आहे. या घटनेत दोघांनी गंभीर जखमी झाल्याने जीव गमावला आहे. वाहन चालक पळून गेल्याने पोलिसांकडून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती मिळते आहे.