शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेला नकोय शहरात ‘शांतता’

By admin | Updated: July 8, 2015 02:53 IST

शहरांमधील ध्वनिप्रदूषणांबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० ची सर्व नागरी क्षेत्रांमध्ये अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत.

शहरांमधील ध्वनिप्रदूषणांबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० ची सर्व नागरी क्षेत्रांमध्ये अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने डॉ. महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देताना, न्यायालयाने ध्वनिप्रदूषण नियमांची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, राज्य शासनानेही अधिसूचना काढून त्यानुसार, महापालिका क्षेत्रात ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रार निवारण कार्यप्रणाली तत्काळ उभारण्यात यावी, त्यास व्यापक प्रसिद्धी दिली जावी, तसेच शहरातील ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी पुरेसे मशिन आणि उपकरणे उपलब्ध करून द्यावीत, याशिवाय या ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमांची अंमलबजावणी व्हावी असे यात नमूद केले आहे. मात्र, महापालिकेकडून अद्याप त्याबाबत काहीच हालचाली झालेल्या नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.व्यावसायिक भागातील ध्वनिप्रदूषण शहरात मोठ्या प्रमाणात लहान औद्योगिक क्षेत्रे आहेत. तर, मोठ्या प्रमाणात व्यावसायिक क्षे़त्र आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानंकानुसार, व्यावसायिक क्षेत्राच्या ठिकाणी सकाळी सहा ते रात्री १० या वेळेत ६५ डेसीबलपर्यंत, रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत ५५ डेसीबल ध्वनिमर्यादा असणे आवश्यक आहे. मात्र, शहरात हे प्रमाण सरासरी ७५ ते ६० डेसीबल आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत शहरातील दुचाकींची मोठ्या प्रमाणात संख्या वाढल्याने ही स्थिती उद्भवली असल्याचे महापालिका प्रशासनाचे मत आहे.शांतता क्षेत्रात शांतता नावालाच विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात रुग्णालयेही आहेत. या शैक्षणिक संस्था तसेच रुग्णालयांच्या परिसरात १०० मीटर अंतरापर्यंत शांतता क्षेत्र घोषित केले जाते. अशी शहरात जवळपास ११०० शांतता क्षेत्र असून, या ठिकाणी माहिती फलक लावण्यासाठी पालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. या ठिकाणी ध्वनीची पातळी दिवसा ५० डेसीबल तर रात्री ४० डेसीबल असणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरात हे प्रमाण सरासरी ६० ते ५० डेसीबल असल्याचे दिसून येते. यासही वाढती वर्दळ आणि मोठ्या प्रमाणावरील नागरीकरण जबाबदार आहे.रहिवासी क्षेत्रालाही ध्वनिप्रदूषणाचा विळखा रहिवासी क्षेत्राच्या परिसरात दिवसा ५५ डेसीबल तर रात्री ४५ डेसीबलची ध्वनिमर्यादा निश्चित करून देण्यात आलेली आहे. मात्र, शहरातील कात्रज तलाव आणि खडकवासला परिसर वगळता कोठेही या मानकांएवढा ध्वनी नाही. शहरात सर्वत्रच सरासरी ७० ते ५५ डेसीबल ध्वनीची पातळी रहिवाशी क्षेत्रात दिसून येते. त्यामुळे रहिवासी क्षेत्रातही ध्वनिप्रदूषणाच्या विळख्यात आल्याचे स्पष्ट होते.