शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर परिवर्तन पॅनलचे निर्विवाद वर्चस्व 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 18:47 IST

दर पाच वर्षांनी होणा-या या निवडणूकीने राज्यातील सहकार क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. सहकार क्षेत्राला सत्ताधा-यांनी गांभीर्याने घेण्याची वेळ आल्याचे स्पष्ट संकेत या निवडणूकीच्या निकालाने दिले आहे.

ठळक मुद्देराज्यातील सुमारे ७ लाख कुटुंबियांशी थेट संबंधित असलेल्या या क्षेत्रातील निवडणूक

पुणे : सहकार जगताचे लक्ष वेधलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवर्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी प्रणित सहकार पॅनलचा धुव्वा उडवित  राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉंग्रेस प्रणित सहकार पॅनेलने २१ पैकी २० जागा जिंकून पुन्हा एकदा सहकारावरील निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले़. राज्यातील सहकार क्षेत्रात मोठे फेरबदल घडविणा-या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत मतदारांचा विश्वास सार्थ ठरवत परिवर्तन पँनलने संजीव कुसाळकर यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आमदार प्रवीण दरेकर यांच्या सहकार पँनलचा धुव्वा उडवत घवघवीत विजय मिळवला आहे. मतदारांच्या भक्कम पाठिंब्यावर संघाला यशोशिखरावर नेण्याचा मनोदय कुसाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.     तब्बल ५० वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत सहकार पँनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही ही विशेष बाब या निवडणुकीत पाहायला मिळाली. राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सहकार क्षेत्राबरोबरच राजकारणावरही या निवडणुकीचा दूरगामी परिणाम होणार असल्याचे संकेत या निवडणुकीने दिले आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची दि. ६ मार्च रोजी २१ जागांपैकी १० जागांसाठी मतमोजणी झाली. यामध्ये परिवर्तन पॅनलचे १० उमेदवार निवडून आले. तर परिवर्तन पँनलचे १ उमेदवार माधवराव सोनवणे हे राज्यस्तरीय मतदारसंघातून याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. तर ४ उमेदवारांनी हे विभागीय मतदारसंघातून निवडून आल्यानंतर परिवर्तन पॅनलला पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत एकूण २२०० मतदारांपैकी १८०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दर पाच वर्षांनी होणा-या या निवडणूकीने राज्यातील सहकार क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. आमदार प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलला प्रत्येक मतदारसंघात परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी धोबीपछाड दिला. मोठ्या मताधिक्याने परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत. राज्यातील सुमारे ७ लाख कुटुंबियांशी थेट संबंधित असलेल्या या क्षेत्रातील ही निवडणूक अनेक अर्थांनी लक्षवेधी ठरलेली आहे. राज्याच्या कानाकोप-यात मोठ्या प्रमाणावर संघटन असलेल्या या सहकार क्षेत्राला सत्ताधा-यांनी गांभीर्याने घेण्याची वेळ आल्याचे स्पष्ट संकेत या निवडणूकीच्या निकालाने दिले आहेत. राज्यातील सहकार क्षेत्रात मोठे फेरबदल घडविणा-या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत मतदारांचा विश्वास सार्थ ठरवत परिवर्तन पँनलने संजीव कुसाळकर यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आमदार प्रवीण दरेकर यांच्या सहकार पँनलचा धुव्वा उडवत घवघवीत विजय मिळवला आहे.परिवर्तन पॅनलचे संजीव कुसाळकर -१११५ मते मिळवून विजयी झाले. तसेच चंद्रकांत जाधव ,सुनील ताटे, मुकुल  पोवार, विलास महाजन निवडून सहकार पॅनलच्या नितीन बनकर यांना ८३३ मते मिळाली. तर गोपाळ म्हस्के अनंत लायगुडे, प्रकाश लोणारे, यशवंत सावंत यांचा पराभव झाला.

........................

 वंचित सहकार क्षेत्राला न्याय देवू राज्याच्या विकासात कायम महत्त्वाचा वाटा असलेल्या सहकार क्षेत्रातील या घटकाला अपेक्षित न्याय मिळालेला नाही. त्यामुळे मिळालेल्या या मतरूपी आशिवार्दाचा उपयोग या क्षेत्राला ख-या अथार्ने न्याय मिळवून देण्यासाठी करणार आहे. मतदारांच्या भक्कम पाठिंब्यावर संघाला यशोशिखरावर नेणार आहे. 

                                                                                                                                                                                           संजीव कुसाळकर

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीcongressकाँग्रेस