शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ मुलांबरोबर पाडवा केला गोड

By admin | Updated: March 29, 2017 00:16 IST

गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्रच गुढी उभारली जात असताना, मराठी नववर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या जात असताना येथील

शिरूर : गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्रच गुढी उभारली जात असताना, मराठी नववर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या जात असताना येथील अ‍ॅक्टिव्ह ग्रुपच्या महिलांनी ‘माहेर’ संस्थेतील अनाथ मुलांसमवेत पाडवा साजरा केला. या मुलांच्या जीवनात आनंददायी ‘गुढी’ उभारण्याचा प्रयत्न केला. मराठी नववर्षाची इतकी आनंददायी सुरुवात पाहून मुलेही भारावून गेली. या महिलांचे त्यांनी मनापासून आभार मानले. ‘अ‍ॅक्टिव्ह’ ग्रुप हा एक सामाजिक ग्रुप असून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवून समाजाप्रती आपले दायित्व दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. कधी वृद्धाश्रमात जाऊन तेथील वृद्धांच्या चेहऱ्यावर या महिला हसू आणतात, तर कधी विशेष मुलींमध्ये रममाण होऊन त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात. या उपक्रमातूनच जीवनाचा आनंद लुटणाऱ्या या ग्रुपच्या अध्यक्षा कामिनी बाफणा यांच्या कल्पनेतून ग्रुपच्या सदस्या मंगल संचेती, मनीषा नहार, सपना वरमेचा यांच्या पुढाकारातून आज ग्रुपच्या महिलांनी माहेरमध्ये जाऊन मुलांना स्नेहभोजन दिले. त्या मुलांची आस्थेने चौकशी केली. या मुलांना आनंद देतानाच या महिलांनी आज आॅटोमोबाईल क्षेत्रात काम करणारी वृषाली कर्दिले व ‘जलदूत’ हे पाणी विक्रीची रिक्षा चालवणारी रोहिणी दुर्वे व सुनीता ठुबे यांचा विशेष सत्कार करून त्यांना गौरवले. ‘अ‍ॅक्टिव्ह’ ग्रुपच्या अध्यक्षा कामिनी बाफणा, रुपाली बोरा, मोना भंंडारी, रेशमा भंडारी, वर्षा सुराणा, शिल्पा संघवी, भाग्यश्री संघवी आदी या वेळी उपस्थित होत्या. माहेरच्या मीना भागवत व विजय तंवर यांनी स्वागत केले.मायेचा हात : आनंद देण्याचा प्रयत्नदिवसभर त्यांच्यासमवेत राहून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला. मायेला आसुसलेल्या या मुलांच्या डोक्यावर मायेचा हात फिरवून काही काळ त्यांना ‘ते’ अनाथ नसल्याचा आभास निर्माण करून दिला. मुलेही या मायेने हरवून गेली. संध्याकाळी या महिला घरी परत परतताना मुलांनी त्यांचे आभार मानले.