शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

आमच्याच नेत्यांनी आणली मेट्रो!

By admin | Updated: September 11, 2015 04:54 IST

गेल्या ६ वर्षांपासून रखडलेल्या मेट्रोच्या आराखड्यास बुधवारी दिल्लीतील बैठकीत मान्यता देण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या महापालिकेच्या मुख्य सभेत मेट्रो

पुणे : गेल्या ६ वर्षांपासून रखडलेल्या मेट्रोच्या आराखड्यास बुधवारी दिल्लीतील बैठकीत मान्यता देण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या महापालिकेच्या मुख्य सभेत मेट्रो आमच्याच पक्षाने व आदरणीय नेत्यांनी आणल्याचे मोठमोठे दावे करून सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी भाषणे केली. त्याचबरोबर कुरघोडीचे राजकारण करीत एकमेकांच्या नेत्यांवर टीका करताना सभागृहाच्या मर्यादा ओलांडल्या गेल्याचे भानही नगसेवकांना राहिले नाही.महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली आज जुलै महिन्याची सर्वसाधारण सभा होती. सभेला सुरूवात झाल्यानंतर शहरातील मेट्रोसह, रिंग रोड, चांदणी चौकातील उड्डाणपूल, विमानतळ या प्रश्नांची सोडवणूक झाल्याबद्दल सर्वच पक्षांकडून अभिनंदनपर भाषणे करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस व मनसेच्या नेत्यांना निमंत्रण न दिल्याबद्दल त्यांच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला असता, त्यामध्येही काँग्रेसच्या नेत्यांचा उल्लेख न करण्यात आल्याबद्दल गटनेते अरविंद शिंदे यांनी तीव्र आक्षेप घेतला. महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना पुण्यात मेट्रो योजना आणण्यात आली, तसेच काँग्रेसचे तत्कालीन नगरविकास मंत्री कमलनाथ यांनी पुढाकार घेऊन त्याला गती दिली. त्या वेळी मेट्रोला विरोध करणारे आता आम्हीच मेट्रो आणल्याची भाषणे करीत असल्याची टीका अरविंद शिंदे यांनी केली. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते.सभागृह भान ठेवून वागणार आहे का?विवेकवादी विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडण्यात येत असताना कुरघोडीचे राजकारण करण्यासाठी त्यामध्ये केंद्राच्या अभिनंदनाचा ठराव घुसडविण्याच्या प्रकारावर रिपब्लिकन पक्षाचे गटनेते सिद्धार्थ धेंडे यांनी तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली. श्रेयाचे राजकारण घेण्याच्या नादात आपण काय करीत आहोत याचे भान सभागृह ठेवणार आहे की नाही असा उद्विग्न सवाल धेंडे यांनी केला. शरद पवार यांच्यामुळे मेट्रोचा प्रश्न मार्गी लागला आहे. सत्तेत नसतानाही कशी कामे करून घ्यायची हे पवार यांच्याकडून शिकले पाहिजे.’’ - बंडू केमसे, सभागृह नेते कॉँग्रेसने मेट्रोची सुरूवात केली आहे, मेट्रो प्रकल्प मार्गी लागल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडूनच त्याचे उद्घाटन केले जाईल.’’- आबा बागूल, उपमहापौर यंदा महापालिकेमध्ये मनसेचे २९ नगरसेवक निवडून आले, म्हणूनच मेट्रोचा प्रश्न मार्गी लागला.’’- राजेंद्र वागस्कर, मनसेपुण्यामध्ये मेट्रो हा पहिला शब्द सुरेश कलमाडी यांनी उच्चारला. त्यांचे स्वप्न होते पुण्यामध्ये मेट्रो सुरू करायची. मेट्रो प्रकल्पाचे श्रेय त्यांनाही दिले पाहिजे.’’- सुनंदा गडाळे