शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा मला आपल्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल; रुपाली पाटलांचा ट्रॉलर्सला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 16:16 IST

आपल्याला संविधानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुसऱ्यासाठी गैरवापर करून बदनामी, अश्लील कमेंट करू नये

पुणे : पुण्याच्या प्रभाग क्रमांक २५ आणि २६ मधून राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र दोन्हीकडे मतदारांनी रुपाली पाटील यांना नाकारल्याने त्यांचा पराभव झाला. निकालाच्या दिवशी मतमोजणीवर आक्षेप घेत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पुन्हा मतमोजणी घेण्यात आली होती. तरीही निकालात काही बदल झाला नाही. या सर्व घडामोडीनंतर त्यांच्या सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट येत असल्याचे रुपाली यांनी  सांगितले आहे. याबाबत कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी सोशल मीडियावरून दिला आहे. 

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या. सोशल मीडियावर बंधु, भगिनी, वडील मंडळी तसेच पोर्टल, न्यूज चॅनेल यांनी माझ्या बाबतीत जाणीवपूर्वक हेतुपरस्पर फेक नेरेटिव पोस्ट, बदनामीकारक पोस्ट, अश्लील कमेंट कृपया करु नये. वैचारिक मनभेद असतील ,आपण माहिती घेऊन तपासून खात्री करून मगच व्यक्त व्हावे किंवा पोस्ट करावी. आपल्याला संविधानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुसऱ्यासाठी गैरवापर करून बदनामी, अश्लील कमेंट करू नये. अन्यथा नाहक आपल्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी लागेल व गुन्हा सुद्धा दाखल करावा लागेल. त्यामुळे माझी विनंती आहे की, फेक नेरेटिव पसरवणाऱ्या ट्रॉलर्सला माझ्या बाबतीत कोणतीच चुकीच्या बदनामीच्या पोस्ट करू नये. जाणीवपूर्वक गैरसमज करणाऱ्या पोस्ट करू नये. मी व माझी सोशल टीम परिवार ट्रॉलर्सला जशास तसे उतर देण्यास समर्थ आहोतच. पण त्यासोबत कडक कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यास तत्पर आहे. त्यामुळे ट्रॉलर्स तो कोणत्याही पक्षाचा, जातीचा, धर्माचा असो संविधानाने, कायद्याने, घटनेने कायदेशीर कारवाईस पात्र राहील. नो फेक नेरेटिव, नो बदनामी पोस्ट, नो अश्लील कमेंट्स,नो अब्रुनुकसान नो समाज भावना दुखावणे. हीच जाहीर नोटीस समजावी असे त्यांनी पोस्ट करून सांगितले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rupali Patil warns trolls of strict legal action otherwise.

Web Summary : Rupali Patil Thombare, after facing defeat and online defamation, warns social media trolls of legal action for fake narratives and obscene comments. She urges responsible social media usage.
टॅग्स :PuneपुणेPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६NCPराष्ट्रवादी काँग्रेसFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडियाCourtन्यायालयPoliceपोलिसadvocateवकिल