शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांची यादी तयार करण्याचे आदेश

By admin | Updated: March 17, 2015 00:17 IST

खासगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूचे उपचार घेतलेल्या आणि घेणाऱ्या रुग्णांची आणि उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची यादी तयार करण्याचा आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांना दिला आहे.

पुणे : खासगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूचे उपचार घेतलेल्या आणि घेणाऱ्या रुग्णांची आणि उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची यादी तयार करण्याचा आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांना दिला आहे. त्यानुसार पुण्यातून ५८ रुग्णांची यादी तयार करण्यात आली असून, संबंधित रुग्णांसह मृत रुग्णांच्या नातेवाइकांना परतावा देण्यात येणार आहे.स्वाइन फ्लूच्या रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार देण्याची घोषणा मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, त्याच्या अंमलबजावणीबाबत गोंधळ सुरू होता. अंमलबजावणीची सुरूवात करण्याअगोदर रुग्णांची यादी तयार असावी, यासाठी राज्यातील विविध खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांची यादी तयार करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.खासगी रुग्णालयांमध्ये दोन मार्चपासून स्वाइन फ्लूचे उपचार घेतलेल्या सर्व रुग्णांचा खर्च सरकार उचलणार आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सकांनी मृत अथवा उपचारानंतर बरे होऊन गेलेल्या रुग्णांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. हनुमंत चव्हाण म्हणाले, की औंध जिल्हा रुग्णालयाने पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांची व मृत रुग्णांची यादी तयार केली आहे. त्यामध्ये ५८ जणांची नावे आहेत. त्यात पुण्यातून ४३ जणांचा, तर पिंपरीतील १५ रुग्णांचा समावेश आहे.पुणे जिल्हयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एस. साठे म्हणाले, की पुणे तसेच पिंपरी चिंचवडमधील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची यादी तयार केली असून, ती आरोग्य संचालकांना पाठविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)