शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

"सरकार पडणार याशिवाय विरोधकांकडे दुसरा कुठला मुद्दाच नाही!" खासदार सुप्रिया सुळेंचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 15:55 IST

विरोधकांना आरोप करण्याचा अधिकार आहे पण प्रत्यक्षात तुम्ही राज्यात जाऊन पाहिले तर अशी परिस्थिती नाही.

ठळक मुद्देवर्षभराच्या काळात महाविकास आघाडी सरकारचे उत्तम काम

बारामती: महाविकास आघाडी सरकार सर्वच पातळ्यांवर उत्तम काम करत आहे. गेल्या वर्षभराच्या काळात महाविकास आघाडी सरकारने उत्तम काम केलेले आहे. कोविड, अतिवृष्टी यासारख्या अडचणी व संकटावर सरकारने यशस्वी मात केली.परदेशातील लोक जेव्हा भारतात येतात तेव्हा जी माहिती त्यांना दिली जाते, त्यातही महाराष्ट्राने उत्तम काम केल्याचेच नमूद केलेले आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडी सरकारचे कौतुक करतानाच विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे.

बारामती शहरातील  म.ए.सो. विद्यालयात पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या मतदानासाठी खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. यावेळी त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्या पत्रकारांशी संवाद साधला. 

यावेळी खासदार सुळे म्हणाल्या,विरोधकांना आरोप करण्याचा अधिकार आहे पण प्रत्यक्षात तुम्ही राज्यात जाऊन पाहिले तर अशी परिस्थिती नाही.सरकार पडणार ,या मुद्याशिवाय विरोधकांकडे टीका करण्यासारखा मुद्दाच नाही. त्यामुळे विरोधक, त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते अस्वस्थ झालेले आहेत. त्यांना पक्षात टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने सरकार पडणार असे म्हणावे लागते असा टोला सुळे यांनी लगावला.

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न संवेदनशीलपणे मांडण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. मतदानासाठी वातावरण चांगले आहे, हवाही स्वच्छ आहे. लॉकडाऊनमुळे प्रदूषण खूप कमी झाले आहे, महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून राज्यात वातावरण चांगले आहे, असे मिश्किलपणे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.वीजबिलांच्या तक्रारीसाख्या काही बाबींवर मोकळेपणाने बोलता येत नव्हते. आता आचारसंहिता संपल्यानंतर या बाबतचे धोरण आपल्याला लवकरच समजेल,असे खासदार सुळे म्हणाल्या.———————————— 

टॅग्स :BaramatiबारामतीPoliticsराजकारणSupriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपा