शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

हेल्मेट सक्तीसाठी राहिले सात दिवस ; पुणेकर अजूनही गंभीर नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 8:15 PM

एक तारखेला आता अवघे सात दिवस राहिले असताना पुणेकर या हेल्मेट सक्तीबाबत फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे. पुण्यातील हेल्मेट विक्रेत्यांशी संवाद साधला असता हेल्मेट विक्रीत फरक पडला नसल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून पुण्यात जर काेणी हेल्मेट न घालता दुचाकी चालवत असेल तर त्यावर कारवाई करणार असल्याचे वाहतूक पाेलिसांनी जाहीर केले आहे. काही दिवसांपूर्वी सरकारी कार्यालये आणि काही महाविद्यालयांच्या बाहेर उभे राहून हेल्मेट घालून न येणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली हाेती. एक तारखेला आता अवघे सात दिवस राहिले असताना पुणेकर या हेल्मेट सक्तीबाबत फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे. पुण्यातील हेल्मेट विक्रेत्यांशी संवाद साधला असता हेल्मेट विक्रीत फरक पडला नसल्याचे त्यांनी सांगितले.     शहरात घडलेल्या प्राणांतिक अपघातांची संख्या अधिक असल्याने तसेच या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी अनेक दुचाकी चालकांनी हेल्मेट परीधान केले नसल्याचे समाेर आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पाेलिसांकडून एक जानेवारीपासून शहरात हेल्मेट सक्ती लागू करण्यात येणार आहे. यावर आता विविध राजकीय पक्षांकडून विराेध हाेत आहे. या आधी अनेकदा शहरात हेल्मेट सक्तीचा प्रयाेग करण्यात आला हाेता. परंतु प्रत्येकवेळी नागरिकांनी याला कडाडून विराेध केल्याने सक्ती मागे घ्यावी लागली हाेती. आता पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. 

    लाेकमतने पुण्यातील विविध हेल्मेट दुकानांचा आढावा घेतला असता, नागरिकांकडून हेल्मेट खरेदीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. हेल्मेट सक्तीच्या निर्णय झाला असला तरी हेल्मेट खरेदीत फारशी वाढ झालेली नाही. काही नागरिक सुरुक्षेसाठी हेल्मेट घेण्याकडे सध्या वळत असल्याचे चित्र आहे. हेल्मेट विक्रेते जगदीश शिंदे म्हणाले, येत्या एक तारखेपासून शहरात हेल्मेट सक्तीची घाेषणा करण्यात आली असली तरी नागरिक हेल्मेट सक्ती फारशी गांभिर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. हा निर्णय जाहीर केला असला तरी नागरिकांकडून हेल्मेट खरेदीत फारसा फरक पडला नाही. जे एक दाेन टक्के प्रमाण वाढले असेल ते डाेक्याचे संरक्षण म्हणून आणि प्रदूषणापासून बचाव व्हावा यासाठी नागरिक हेल्मेट खरेदी करत आहेत. त्यातही महिलांचा हेल्मेट खरेदी करण्याकडे कल जास्त आहे. साधारण आठशे ते चार ते पाच हजारांपर्यंत हेल्मेट विक्रीस उपलब्ध आहेत. 

    रामदास भगत म्हणाले, हेल्मेट सक्ती जाहीर केली असली तरी नागरिकांमध्ये त्याचे फारसे गांभिर्य नाही. या आधी अनेकदा हेल्मेट सक्ती करण्यात आली हाेती. परंतु दरवेळेस ती मागे घेण्यात आली. जवळच्या अंतरावर जाण्यासाठी लाेक हेल्मेट वापरत नाहीत. ज्यांना हायवेने प्रवास करायचा आहे किंवा ज्यांना दरराेज 15 ते 20 किलाेमीटरचे अंतर पार करावे लागते असे नागरिक हेल्मेट वापरतात. एक तारखेपासून जरी हेल्मेट सक्ती हाेणार असली तरी दरवेळेस प्रमाणे यंदाही ती मागे घेण्यात येईल या आशेने नागरिकांचा हेल्मेट खरेदीला फारसा प्रतिसाद नाही. 

टॅग्स :AccidentअपघातHealthआरोग्यtwo wheelerटू व्हीलरPuneपुणेPoliceपोलिस