Join us  

उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 7:20 AM

उत्तर, उत्तर मध्य, उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांना मिळाली १५ पैकी ११ वेळा ५० टक्क्यांहून अधिक मते

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केवळ मतदानाचा टक्का वाढविण्यातच नव्हे, तर एखाद्या उमेदवाराला भरभरून मतदान करून विजयी करण्यातही उपनगरातील रहिवाशांच्या तुलनेत शहरातील मतदार हात आखडता घेत असल्याचे दिसून येते. मुंबईत गेल्या पाच वर्षांतील लोकसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास हे वास्तव दिसून येते.

उदाहरणार्थ, मुंबईच्या उपनगराचा भाग असलेल्या उत्तर, उत्तर मध्य आणि उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार १५ पैकी ११ वेळा ५० टक्क्यांहून अधिक मते घेऊन विजयी झाले आहेत. तुलनेत दक्षिण मध्य, उत्तर मध्य आणि दक्षिण मुंबईतील उमेदवार १५ पैकी केवळ ६ वेळा ५० टक्क्यांहून अधिक मते घेऊन जिंकून आले आहेत.

सर्वाधिक मते गोपाळ शेट्टींना मोदी लाटेत गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबईतून २०१४ आणि २०१९ अशा दोन्ही वेळेस अनुक्रमे ७० आणि ७१ टक्के मते मिळवून सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान मिळविला आहे. त्या खालाेखाल गजानन कीर्तिकर यांनी उत्तर पश्चिममधून २०१९ साली ६१ टक्के मते मिळविली होती.

मागील पाच लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांची टक्केवारी

मुंबई उत्तर गोपाळ शेट्टी - (भाजप) - ७१ टक्केगोपाळ शेट्टी - (भाजप) - ७० टक्केसंजय निरूपम - (काँग्रेस) - ३७ टक्केगोविंदा (काँग्रेस) - ५० टक्केराम नाईक (भाजप) - ५६ टक्के

मुंबई उत्तर पूर्व मनोज कोटक (भाजप) - ५६ टक्केकिरीट सोमय्या (भाजप) - ६० टक्केसंजय दिना पाटील (राष्ट्रवादी) - ३१ टक्केगुरुदास कामत (काँग्रेस) - ५३ टक्केकिरीट सोमय्या (भाजप) - ४३ टक्के

मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे (शिवसेना) - ५३ टक्केराहुल शेवाळे (शिवसेना) - ४९ टक्केएकनाथ गायकवाड (काँग्रेस) - ४३ टक्केमोहन रावले (शिवसेना) - ३६ टक्केमोहन रावले (शिवसेना) - ४७ टक्के

मुंबई उत्तर पश्चिम गजानन कीर्तिकर (शिवसेना) - ६१ टक्केगजानन कीर्तिकर (शिवसेना) - ५२ टक्केगुरुदास कामत (काँग्रेस) - ३५ टक्केसुनील दत्त (काँग्रेस) - ५२ टक्केसुनील दत्त (काँग्रेस) - ५२ टक्के

मुंबई उत्तर मध्य पूनम महाजन (भाजप) - ५३ टक्केपूनम महाजन (भाजप) - ५६ टक्केप्रिया दत्त (काँग्रेस) - ४८ टक्केएकनाथ गायकवाड (काँग्रेस) - ४९ टक्केमनोहर जोशी (शिवसेना) - ५५ 

मुंबई दक्षिण अरविंद सावंत (शिवसेना) - ५२ टक्केअरविंद सावंत (शिवसेना) - ४८ टक्केमिलिंद देवरा (काँग्रेस) - ४२ टक्केमिलिंद देवरा (काँग्रेस) - ५० टक्केजयवंतीबेन मेहता (भाजप) - ४७ टक्के

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबई दक्षिण मध्य