शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षात केवळ २०० खासगी रुग्णालयांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST

पुणे : सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये ७१५, जिल्हा परिषदेकडे ८२८ तर जिल्हा रुग्णालयाकडे ३२६ खासगी रुग्णालयांची नोंद करण्यात आली आहे. ...

पुणे : सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये ७१५, जिल्हा परिषदेकडे ८२८ तर जिल्हा रुग्णालयाकडे ३२६ खासगी रुग्णालयांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये तिन्ही ठिकाणी मिळून केवळ २०० नवीन खासगी रुग्णालयांची नोंद झाली आहे. रुग्णालयांच्या नोंदणीसंदर्भात कोणतीही शंका आढळल्यास किंवा तक्रार नोंदवल्यास तातडीने कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागातर्फे देण्यात आले आहे.

बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्टनुसार खासगी रुग्णालयांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. खासगी रुग्णालयांची शहरातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना काळात खासगी रुग्णालयांकडून, डॉक्टरांकडून रुग्णांकडून अवाजवी बिले आकारण्यात आल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या. बोगस रुग्णालयांना खीळ बसावी, यासाठी नोंदणीची तपासणी केली जाते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रुग्णालयांची संख्या झपाट्याने वाढत असताना त्यांची नोंदणी केली जात आहे का, याबाबतचे नियम कडक करण्याची मागणीही होत आहे.

ग्रामपंचायत हद्दीतील खासगी रुग्णालयांची नोंदणी जिल्हा परिषदेकडे होते. नगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तर महानगरपालिका हद्दीतील खासगी रुग्णालयांची नोंदणी महापालिकेकडे केली जाते. दर तीन वर्षांनी नोंदणीचा परवाना नूतनीकरण करणे गरजेचे असते. नियमांची अंमलबजावणी न केल्यास दवाखान्यांवर कायद्यानुसार कारवाई करता येऊ शकते.

--------------

पुणे जिल्ह्यातील नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची संख्या :

महानगरपालिका : ७१५

जिल्हा रुग्णालय : ३२६

जिल्हा परिषद : ८२८

------------------------------

रुग्णालयांची नोंदणी केलेली नसल्याचे आढळून आल्यास तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनीही अशी बाब आढळून आल्यास त्वरित तक्रार नोंदवावी.

- डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य चिकित्सक

-----------------

बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्ट अंतर्गत नोंदणी केलेली नसल्यास रुग्णालयांना तीन वेळा नोटीस पाठवली जाते. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. नोटिसींना समाधानकारक उत्तर न दिल्यास तातडीने कारवाई केली जाते.

- डॉ. मनीषा नाईक