आॅनलाईन फॉर्म विक्री अजूनही आॅफलाईन

By Admin | Updated: June 13, 2015 04:32 IST2015-06-13T04:32:42+5:302015-06-13T04:32:42+5:30

आदिवासी विकास विभागाने वसतिगृहात प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने फॉर्म भरून प्रवेश घेण्याची प्रक्रिया यावर्षीपासून सुरू केली आहे.

Online form sales are still offline | आॅनलाईन फॉर्म विक्री अजूनही आॅफलाईन

आॅनलाईन फॉर्म विक्री अजूनही आॅफलाईन

घोडेगाव : आदिवासी विकास विभागाने वसतिगृहात प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने फॉर्म भरून प्रवेश घेण्याची प्रक्रिया यावर्षीपासून सुरू केली आहे. मात्र अजूनही फॉर्म भरण्याची साईट आॅफ लाईन असल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण निर्माण झाली आहे. आंबेगाव तालुक्यात घोडेगाव, मंचर, शिनोली येथे आदिवासी मुला-मुलींची वसतिगृहे आहेत. येथील वसतिगृहांसाठी नवीन इमारती बांधण्यात आल्या असल्यामुळे येथे प्रवेशासाठी जास्त मागणी आहे. मागील वर्षी आदिवासी विकास विभागाने मंजूर विद्यार्थिसंख्येपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची सोय झाली होती. मात्र यावर्षी जादा प्रवेश दिले जाणार नसल्याचे आदिवासी विकास विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध होऊ शकणार नाही.
तसेच बाहेरच्या तालुक्यातील मुले मंचर, घोडेगाव येथील वसतिगृहांमध्ये प्रवेश मागतात. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाहीत. यासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या बाहेरच्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना आंबेगाव तालुक्यातील वसतिगृहांमध्ये प्रवेश द्या; मात्र महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या तालुक्यातील वसतिगृहात प्रवेश द्यावा तसेच साईट त्वरित सुरू करावी अथवा जुन्या पद्धतीने फॉर्म भरून घ्यावेत अशी मागणी पिंपरगणे गावचे उपसरपंच व युवकनेते भीमा गवारी यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Online form sales are still offline