भोर महाड रस्त्यावरील शिरगाव जवळ कार खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 11:57 IST2025-09-29T11:57:22+5:302025-09-29T11:57:30+5:30
शिरगाव हद्दीत पाऊस व धुके असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खोदलेल्या मोरी टाकण्याच्या खड्ड्यात कार पडून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती

भोर महाड रस्त्यावरील शिरगाव जवळ कार खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी
भोर : भोर महाड रस्त्यावरील वरंधा घाटातील शिरगाव (ता.भोर) हद्दीत मोरी टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून कारचाअपघात झाल्याची घटना रविवारी (ता.२९) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यात एकाचा मृत्यू तर एकजण जखमी झाला आहे. राहुल विश्वास पानसरे (वय ४५ रा.घाटकोपर,मुंबई) यांचा मृत्यू झाला आहे. तर राहुल देवराम मुटकुले (वय ३२) हे गंभीर जखमी आहेत.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोयोटा कंपनीची कार भोरहून महाडकडे जात होती. शिरगाव हद्दीत पाऊस व धुके असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खोदलेल्या मोरी टाकण्याच्या खड्ड्यात कार पडून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात राहुल विश्वास पानसरे (वय ४५ रा.घाटकोपर,मुंबई) यांचा मृत्यू झाला. तर राहुल देवराम मुटकुले (वय ३२) हे जखमी आहेत. कारमध्ये दोघेच प्रवास करत असून ते गणपतीपुळे येथे जात होते.
घटनास्थळी भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब पवार, पोलिस हवालदार गणेश लडकत, सुनिल चव्हाण, अजय साळुंके, ज्ञानेश्वर शेडगे यांनी पोहचून मृतदेह बाहेर काढून भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान जखमीला सिव्हिल हॉस्पिटल (ता महाड) येथे उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिस पाटील शंकर पारठे, वक्रतुंड क्रेन सर्व्हिसचे अक्षय धुमाळ व स्थानिकांनी मदत केली. पुढील तपास भोर पोलिस करीत आहेत. चौकट-भोर-महाड रस्त्याच्या अपूर्ण कामाचा पहिला बळी मागील सहा सात महिन्यापासून भोर महाड रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी मोऱ्या टाकण्यासाठी खड्डे खोदून ठेवले आहे. रस्त्याची कामे अपूर्ण आहेत पाऊस पडत आहे. यामुळे चिखल झाला असून रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. काल रात्री अशाच प्रकारे अपूर्ण कामाचा पहिला बळी गेला आहे.