शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

नियुक्ती एकीकडे अन् काम दुसरीकडेच

By admin | Updated: February 23, 2015 00:51 IST

महापालिकेतील ३८ अधिकाऱ्यांची नियुक्ती दुसऱ्या विभागामध्ये असतानाही प्रत्यक्षात वर्षानुवर्षे ते बांधकाम नियंत्रण विभागामध्ये कार्यरत आहेत.

पुणे : महापालिकेतील ३८ अधिकाऱ्यांची नियुक्ती दुसऱ्या विभागामध्ये असतानाही प्रत्यक्षात वर्षानुवर्षे ते बांधकाम नियंत्रण विभागामध्ये कार्यरत आहेत. याबाबत नगरसेवक तसेच स्वयंसेवी संस्थांच्या तक्रारीनंतरही अद्याप प्रशासनाकडून त्यावर काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. दर ३ वर्षांनी बदली करण्याच्या महापालिका सेवा नियमावलीस गुंडाळून ठेवून अधिकाऱ्यांचे हितसंबंध राजरोसपणे जपले जात आहेत.महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्यांसंदर्भातील धोरणास २१ जानेवारी २००४ रोजी मुख्य सभेने मान्यता दिली. त्यानुसार एकाच खात्यात सलग ३ वर्षे सेवा झाल्यानंतर अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी; तसेच खात्याच्या एकूण पदांपैकी दरवर्षी जास्तीत जास्त २० टक्के अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या कराव्यात, असे धोरण निश्चित केले आहे. मात्र पालिकेचा बांधकाम नियंत्रण विभाग याला अपवाद करण्यात आल्याचे उजेडात आले आहे.कार्यकारी अभियंता (बांधकाम) दर्जाच्या ३ अधिकाऱ्यांची नियुक्ती पाणीपुरवठा विभाग, आयुक्त कार्यालय, गवनि येथे असताना ते प्रत्यक्षात बांधकाम नियंत्रण विभाग, मेट्रो, डीपी सेलमध्ये कार्यरत आहेत. उपअभियंता, १० शाखा अभियंता व १४ कनिष्ठ अभियंता (बांधकाम) दर्जाच्या ११ अधिकाऱ्यांना पथ विभाग, अतिक्रमण, पाणीपुरवठा, भवनरचना, विकास योजना, भूमिप्रापण, मलनिस्सारण येथे नियुक्ती दिली असताना प्रत्यक्षात ते बांधकाम नियंत्रण विभागात कार्यरत आहेत. संबंधित अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत राहिल्याने त्यांचे हितसंबंध तयार झाले आहेत. यातून मिळणारा ‘मलिदा’ लाटण्यासाठी त्यांच्याकडून बदल्यांचे आदेश प्रत्यक्षात आणले जात नाहीत. प्रशासनाने बदली केली तरी ती कागदोपत्रीच राहते, प्रत्यक्षात ते त्यांच्या जुन्या खात्यातच काम करीत राहतात. एखाद्या अधिकारी व कर्मचाऱ्याची बदली झाल्यानंतर त्याला लगेच विभागप्रमुखांनी कार्यमुक्त करणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात विभागप्रमुख त्याला कार्यमुक्त करीतच नाहीत. त्यामुळे काम एकीकडे आणि पगार दुसऱ्या खात्यातून असे अनेक प्रकार महापालिकेमध्ये सुरू आहेत. स्वयंसेवी संस्था तसेच नगरसेवकांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी पाठवून त्याबाबतचा अहवाल १२ डिसेंबर २०१४ पर्यंत सादर करण्याचे आदेश विभागप्रमुखांना दिले होते. मात्र त्यावर प्रत्यक्षात कार्यवाहीच झालेली नाही. याबाबत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, नगरअभियंता प्रशांत वाघमारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.