शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल भरण्यासाठी नाही ‘दमडी-कवडी’

By admin | Updated: July 14, 2014 04:54 IST

कंपनी तोट्यात असल्याचे कारण पुढे करीत ज्या नाही त्या गोष्टीत आखडता हात घेणाऱ्या पीएमपीकडे आता डिझेल भरण्यासाठीही ‘दमडी’ नाही, यामुळे अक्षरश: बसगाड्याच बंद ठेवण्याची वेळ कंपनीवर आली आहे.

पिंपरी : कंपनी तोट्यात असल्याचे कारण पुढे करीत ज्या नाही त्या गोष्टीत आखडता हात घेणाऱ्या पीएमपीकडे आता डिझेल भरण्यासाठीही ‘दमडी’ नाही, यामुळे अक्षरश: बसगाड्याच बंद ठेवण्याची वेळ कंपनीवर आली आहे. मार्गावर धावणाऱ्या बसला लागणारे इंधन व दुरुस्ती याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी आर्थिक नियोजनही महत्त्वाचे असताना कंपनीकडून त्याकडेच दुर्लक्ष केले जात आहे. याचाच परिणाम म्हणून डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणावरून गेल्या आठवड्याभरात तीनवेळा निगडीतील भक्ती-शक्ती आगारातून सुटणाऱ्या विविध मार्गावरील बसगाड्या बंद ठेवण्यात आल्या. ‘आला दिवस ढकलायचा’ असाच पीएमपीचा उद्योग सुरू आहे. भक्ती-शक्ती आगारात १७९ बस आहेत. यापैकी ९६ बस डिझेलवर आहेत. या बसमध्ये निगडीतील एका खासगी पेट्रोलपंपावरून डिझेल भरले जाते. मात्र, डिझेलचे १३ लाखांचे बिल थकल्याने पेट्रोलपंप मालकाने शनिवारी डिझेल भरण्यास नकार दिला. यामुळे आगारातून ३० मार्गांवर सुटणाऱ्या डिझेलवरील २१ गाड्या बंद ठेवल्या होत्या. काही मार्गावर एक-दोन तासाने एखादी बस येत होती. त्यामुळे या बसेसना प्रचंड गर्दी झाली. प्रवाशांना खासगी वाहनांचा वापर करावा लागला. त्यातच पावसाचीही रिपरिप सुरू असल्याने प्रवाशांचे आणखीणच हाल झाले. तोट्यात असल्याचे कारण पुढे करीत सर्वच गोष्टीत वेळ मारुन नेणाऱ्या पीएमपीने डिझेल भरण्यासाठी पैसे देण्यासही ‘हात वर’ केले आहेत. डिझेलअभावी बस धावत नसून, यामुळे प्रवाशांचे तर हाल होतात. डिझेलचे थकित बिल न दिल्याने पेट्रोलपंप मालकाने डिझेल दिले नाही. यामुळे मार्गांवर बस सोडता आल्या नाहीत. तरीही अगोदरचे डिझेल असलेल्या काही बस मार्गावर सोडल्या. मात्र, ते डिझेल अपुरे पडल्याने काही बस रस्त्यातच बंद पडण्याच्या घटना घडल्या. थकित बिल अदा करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी यांची चर्चा झाली असून लवकरच डिझेल उपलब्ध होईल, असे आगार अभियंता गोपीचंद सावंत यांनी सांगितले.(प्रतिनिधी)