शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील एकही गाव नाही वगळले

By admin | Updated: September 11, 2015 04:51 IST

सहा राज्यांमध्ये पसरलेला पश्चिम घाट संरक्षित व संवर्धित करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन विभागाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचा (एरे) नवीन मसुदा प्रसिद्ध केला असून, त्यामधून

- नीलेश काण्णव,  घोडेगावसहा राज्यांमध्ये पसरलेला पश्चिम घाट संरक्षित व संवर्धित करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन विभागाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचा (एरे) नवीन मसुदा प्रसिद्ध केला असून, त्यामधून पुणे जिल्ह्यातील एकही गाव वगळण्यात आलेले नाही. पुणे जिल्ह्यातील ३३७ गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. जैवविविधता नियंत्रण मंडळाने २० टक्के नैसर्गिक भाग असलेली गावे एरेमध्ये घेण्याच्या सूचना केल्या होत्या. सहा राज्यांतील अनेक गावे कमी झाली आहेत; मात्र पुणे जिल्ह्यातील एकही गाव कमी झाले नाही.महाराष्ट्रातील अहमदनगर, धुळे, कोल्हापूर, नंदुरबार, नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे. यापूर्वीची अधिसूचना १० मार्च २०१४ रोजी निघाली होती. या अधिसूचनेवर सहा राज्यांचे अभिप्राय मागविण्यात आले. त्यांनी केलेल्या सूचना व बदल यांचा विचार करून नवीन मसुद्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या मसुद्यात पश्चिम घाटातील जैवविविधता जपण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबरच अनुसूचित जाती व परंपरागत वनवासी यांचे पूर्ण हक्क अबाधित ठेवले आहेत. केंद्र शासनाने नेमलेल्या समितीने सर्व समाविष्ट गावांचा अभ्यास करून त्यातील काही गावांचा समावेश करण्याची गरज नसल्याचे अहवालात नमूद केले आहे़ त्यात पुणे जिल्ह्यातील काही गावांचा समावेश आहे़ यासंबंधीची पुढील कार्यवाही राज्य शासनाने करायची असल्याचे सांगण्यात आले़ पुणे जिल्ह्यातील ३३७ गावे यामध्ये असून, आंबेगाव ३७, भोर ५६, हवेली ४, जुन्नर ३२, खेड २२, मावळ ४९, मुळशी ६५, पुरंदर ९, वेल्हे ६० गावांचा समावेश आहे. पश्चिम घाटातील सहा राज्यांतील ५६८२५ चौरस किलोमीटर क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये केरळमधील ९९९६, गुजरात ४४९, महाराष्ट्र १७३४०, गोवा १४६१, कर्नाटक २०६६८, तमिळनाडू ६९१४ चौरस किलोमीटर क्षेत्र आहे.