Dr Babasaheb Ambedkar Jayanti: पुण्यात ‘नो डीजे’; २५ वर्षांची स्पिकरची परंपरा मोडणार, आंबेडकरांची जयंती विचारांचा जागर करून साजरी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 10:24 IST2026-04-11T10:24:24+5:302026-04-11T10:24:59+5:30

ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना त्रास होऊ नये, म्हणून इतर मंडळांनीही स्पीकर लावू नये, असे आवाहन महोत्सव समितीने केले आहे

'No DJ' in Pune; 25-year-old tradition of speakers will be broken, Ambedkar's birth anniversary will be celebrated by awakening ideas | Dr Babasaheb Ambedkar Jayanti: पुण्यात ‘नो डीजे’; २५ वर्षांची स्पिकरची परंपरा मोडणार, आंबेडकरांची जयंती विचारांचा जागर करून साजरी होणार

Dr Babasaheb Ambedkar Jayanti: पुण्यात ‘नो डीजे’; २५ वर्षांची स्पिकरची परंपरा मोडणार, आंबेडकरांची जयंती विचारांचा जागर करून साजरी होणार

पुणे : सामाजिक परिवर्तनाची प्रयोगशाळा समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘नो डीजे’ म्हणून साजरी केली जाणार आहे. हा ऐतिहासिक निर्णय शहरातील प्रमुख दलित संघटना, उत्सव समिती आणि कार्यकर्ते, तसेच ४० विविध संघटना, मंडळांनी मिळून घेतला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत भीमसेवा प्रतिष्ठान आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी गेली २५ वर्षे सुरू असलेली स्पीकरची (डीजे) परंपरा यंदा कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी ही माहिती दिली. हा निर्णय रामभाऊ डंबाळे, रिपब्लिकन नेत्या सुवर्णा डंबाळे, सिद्धांत सुर्वे, प्रदीप कांबळे, निखिल बहुले, अविराज मराठे, नासीर खान या कार्यकर्त्यांनी एकमताने घेतला आहे. पुणे स्टेशन परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांची अलोट गर्दी लक्षात घेता, ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना त्रास होऊ नये, म्हणून इतर मंडळांनीही स्पीकर लावू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

गोंगाटापेक्षा शांततेच्या माध्यमातून विचारांचा जागर

पुण्याचा ‘नो डीजे’ निर्णय महाराष्ट्रातील इतर शहरांसाठी दीपस्तंभ ठरणार असून, जयंती उत्सवाच्या एका नवीन पर्वाची ही सुरुवात मानली जात आहे. त्यामुळे गोंगाटापेक्षा यंदा शांततेच्या माध्यमातून विचारांचा जागर होणार आहे. यामुळे या निर्णयाचे पोलिस प्रशासनाकडून स्वागत केले जात आहे.

१ हजार अनुयायांना पुस्तक वाटपातून विचारांची पेरणी

मिरवणुकीतील मोठ्या आवाजाचा मानवी आरोग्यावर होणारा घातक परिणाम लक्षात घेऊन आणि नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनांपासून बोध घेत, यंदा स्पीकरवर होणारा अवाढव्य खर्च टाळून १,००० अनुयायांना महापुरुषांच्या विचारांची पुस्तके मोफत वाटली जाणार आहेत. ‘वाचाल तर वाचाल’ हा बाबासाहेबांचा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

ऐतिहासिक ३० फुटांचे बुद्धरूप आणि ‘मूकपट’

यावर्षीच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे ३० फुटांचे तथागतांचे भव्य बुद्धरूप असलेला विशेष देखावा, तसेच ‘गोंगाटात विचार हरवू नका’ हा संदेश देण्यासाठी तथागत बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील ‘तीन पात्री मूकपट’ आयोजित करण्यात आला आहे.

Web Title : पुणे में अंबेडकर जयंती 'नो डीजे' के साथ, विचारों को प्राथमिकता।

Web Summary : पुणे के दलित संगठनों ने डीजे के बिना डॉ. अंबेडकर जयंती मनाने का फैसला किया, 25 साल की परंपरा को तोड़ा। वे बुद्ध, अशोक और अंबेडकर पर एक मूक फिल्म दिखाएंगे और किताबें वितरित करेंगे, जोर शोर के बजाय शांति और चिंतन पर जोर देंगे। इस पहल का उद्देश्य महाराष्ट्र में समान बदलावों को प्रेरित करना है।

Web Title : Pune Celebrates Ambedkar Jayanti Without DJs, Prioritizing Thought and Peace.

Web Summary : Pune's Dalit organizations decided to celebrate Dr. Ambedkar Jayanti without DJs, ending a 25-year tradition. They will distribute books and showcase a silent film on Buddha, Ashok, and Ambedkar, emphasizing peace and thoughtful reflection over loud celebrations. This initiative aims to inspire similar changes across Maharashtra.