शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई करण्याची इच्छा नाही; पण ते वेळेत झाले पाहिजे, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांना समज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 10:43 IST

जिल्ह्यातील सर्व मंडल अधिकाऱ्यांच्या दप्तरांची चौकशी पुढील २० दिवसांत केली जाणार आहे, यावेळी काही चुकीचे आढळल्यास थेट कारवाई होईल

पुणे : जिल्ह्यात महसूल विभागाच्या मूळ कामकाजावर लक्ष केंद्रीय करण्यात आले असून, ई-फेरफार, ई- हक्क, ई-चावडी, सातबारा उतारे, महसुलाची वसुली यांसारख्या कामांचा आता दर पंधरवड्यात आढावा घेतला जाणार आहे. हे कामकाज मंडल अधिकारी करत असल्याने या कामावर आता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हेच थेट लक्ष ठेवणार आहेत. यासाठी या मंडल अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत पाचारण करून त्यांना कामकाजाचे धडे दिले. ‘तुमच्यावर कारवाई करण्याची इच्छा नाही; पण ते वेळेत झाले पाहिजे,’ असे सांगत कामकाज वेळेत करण्याची तंबी दिली.

डुडी यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याला महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात येते. दरवेळी या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांपासून सर्व तहसीलदार उपस्थित राहतात. यामध्ये सुरू असलेली कामे, नवीन उपाययोजना, रखडलेली विकासकामे, नागरिकांच्या अडचणी आदींचा आढावा घेतला जातो. मात्र, मंगळवारी (दि. २) पहिल्यांदाच मंडल अधिकाऱ्यांना या बैठकीस बोलावण्यात आले. जिल्ह्यातील तब्बल १५४ मंडल अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. यावेळी डुडी यांनी नागरिकांना विविध फेरफार वेळेत मिळाले पाहिजेत, पाणंद रस्त्यांचे अतिक्रमण काढले पाहिजे, ई- फेरफार, ई-हक्क व ई-चावडीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे, सातबारा उतारे वेळेत दिले पाहिजेत, महसूल वाढवला पाहिजे, मागील सहा महिन्यांचे पुनर्वसन संकलन रजिस्टर तयार करणे आणि सर्व अभिलेख ऑनलाइन उपलब्ध करून देणे याबाबत सूचनाही दिल्या.

दप्तरांची चौकशी होणार

जिल्ह्यातील सर्व मंडल अधिकाऱ्यांच्या दप्तरांची चौकशी पुढील २० दिवसांत केली जाणार आहे. यावेळी काही चुकीचे आढळल्यास थेट कारवाई होईल, असेही स्पष्ट करण्यात आले. “मंडल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी. अन्यथा अयोग्य काम करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल,” असे डुडी यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीEmployeeकर्मचारीSmart Cityस्मार्ट सिटीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका