शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हरित सेनेच्या वतीने निर्माल्य संकलन

By admin | Updated: September 10, 2014 00:16 IST

प्रतिवर्षाप्रमाणे शाडू मातींच्या गणेशमूर्ती बनविण्याच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते

दौंड : दौंड येथील शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना पथकाकडून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन करण्याबरोबर निर्माल्य संकलन करण्यात आल्याची माहिती प्रशालेचे प्राचार्य तुकाराम गायकवाड यांनी दिली.प्रतिवर्षाप्रमाणे शाडू मातींच्या गणेशमूर्ती बनविण्याच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रशालेतील बाल मंडळांना भिमथडी शिक्षण संस्थेचे सदस्य विक्रम कटारिया यांच्या हस्ते मोफत वितरीत करण्यात आल्या. या बालगणेश मंडळामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात आली. जलप्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी यावर्षी गणेशमूर्ती, अनंत चतुर्थी दिवशी शांततेत गुलालाची उधळण न करता प्रशालेत आणून त्यांची विधीवत पूजा करुन प्रशालेतील अ‍ॅल्युमिनियमच्या मोठ्या भांड्यात विसर्जित केल्या. हरित सेनेचे विद्यार्थी प्रवीण बोरकर, आदेश गायकवाड, अभिषेक चौहान, ओंकार ताठे, गौरव हिरणावळे, आशिष व्हंकाडे, प्रथमेश उतरडे, अमेय घोलप, ऋषिकेश पळसे, आदेश मुनोत, कुणाल बागल, अनिरुद्ध लेले, अवधूत वाळके, धनंजय वाडेकर आदींनी नदीवरील निर्माल्य संकलन केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेतील प्रथम तीन बालगणेश मंडळांना दरवर्षीप्रमाणे स्व. कि. गु. कटारिया यांचे स्मरणार्थ पर्यावरणपूरक गणेश मंडळ पुरस्कार देण्यात येणार असल्याची हरित सेनेचे पथक प्रमुख प्रमोद काकडे यांनी दिली. या उपक्रमांचे हे सलग सातवे वर्ष आहे. (वार्ताहर)