हॉटेलमध्ये सिलेंडरच्या स्फोटात ९ कामगार जखमी; ग्राहक नसल्याने मोठा अनर्थ टळला, दौंड मधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 15:46 IST2026-01-07T15:46:05+5:302026-01-07T15:46:26+5:30
हॉटेलमध्ये नेहमी ग्राहकांची गर्दी असते, पण घटनेच्या वेळी ग्राहक नसल्याने पुढील अनर्थ टळला

हॉटेलमध्ये सिलेंडरच्या स्फोटात ९ कामगार जखमी; ग्राहक नसल्याने मोठा अनर्थ टळला, दौंड मधील घटना
दौंड : दौंड - पाटस रोडवर असलेल्या हॉटेल जगदंबाच्या किचन रूममध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन या घटनेत हॉटेलमधील नऊ कामगार जखमी झाले आहे. तीन कामगारांना दौंड येथील एका खाजगी रुग्णालयात तर सहा कामगारांना पुणे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. हा स्फोट दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला. यावेळी हॉटेलमध्ये ग्राहक नव्हते अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. सिलेंडरचा स्फोट मोठा असल्याने हॉटेलच्या किचन मधील भांडे आणि अन्न अस्थाव्यस्त पडले होते.
सुमारे दहा ते अकरा सिलेंडर किचन रूम मध्ये होते. अचानक स्फोट झाला. हॉटेल वरचे पत्रे उडून गेले आहे. तर ग्राहकांच्या बैठक व्यवस्थेतील काचा खिडक्या तुटून बाहेर पडल्या. तसेच खुर्च्या टेबलही उडाले आहेत. या हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी असते. पण सुदैवाने ग्राहकांची गर्दी नसल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास दौंड पोलीस करीत आहे.