जैन धर्मियांचे श्रद्धास्थान "सम्मेद शिखरजी" पर्यटन स्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ निमगाव केतकी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 02:03 PM2022-12-21T14:03:10+5:302022-12-21T14:03:17+5:30

सम्मेद शिखरजी क्षेत्राचे हजारो वर्षापासूनचे पावित्र धोक्यात येणार

Nimgaon closed for some time in protest against declaration of "Sammed Shikharji" a place of pilgrimage for Jains. | जैन धर्मियांचे श्रद्धास्थान "सम्मेद शिखरजी" पर्यटन स्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ निमगाव केतकी बंद

जैन धर्मियांचे श्रद्धास्थान "सम्मेद शिखरजी" पर्यटन स्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ निमगाव केतकी बंद

Next

निमगाव केतकी : जैन धर्मियांचे भारतातील अत्यंत महत्वपूर्ण तिर्थक्षेत्र आंतरराष्ट्रीय जैन धर्मियांचे भावनिक श्रध्दास्थान "सम्मेद शिखरजी (मधुबन - गिरीडीह )" झारखंड राज्य हे क्षेत्र पर्यटन स्थळ घोषित केल्यामुळे अहिंसक, शुध्द शाकाहारी, निर्व्यसनी अशा संस्कृतीला यामुळे मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे या क्षेत्राचे हजारो वर्षापासूनचे पावित्र धोक्यात येणार आहे. या पुर्वी जैन धर्मिय केंद्रीय समितीने राज्य आणि केंद्र सरकारलापर्यटनस्थळ करण्याच्या निर्णयापासुन आपण विचार करावा अशी विनंती केली आहे.

परंतु याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने निमगाव केतकी येथे जैन समाजाच्या वतीने (दि.२१ डिसेंबर) निमगाव केतकी बंदचे आवाहन करण्यात आले होते. निमगाव केतकी येथील व्यापाऱ्यांनी  १००% गाव बंद ठेवून या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. यावेळी सकल जैन समाज उपस्थित होता यावेळी गावातील तात्यासाहेब वडापुरे, बाबासाहेब भोग, संतोष राजगुरु, फरांदे, मनोज भोग, धनंजय राउत, संतोष भोंग, नाना चांदणे, ॲड. श्रीकांत करे यांनी या बंदला पाठिंबा दिला.

Web Title: Nimgaon closed for some time in protest against declaration of "Sammed Shikharji" a place of pilgrimage for Jains.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.