शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

गुंठेवारीचा निर्णय येत्या चार दिवसांत : मुख्यमंत्री

By admin | Updated: July 18, 2014 03:47 IST

गुंठेवारीच्या प्रश्र्नावर येत्या चार दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले आहे

उरुळी कांचन : गुंठेवारीच्या प्रश्र्नावर येत्या चार दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष व थेऊरगावचे सरपंच नवनाथ काकडे यांनी ही माहिती दिली. राज्यातील विविध गावांच्या सरपंचांची परिषद नुकतीच थेऊर येथे झाली. या परिषदेत ठरल्याप्रमाणे विविध प्रश्र्नांवर चर्चा करण्यासाठी मुंबई येथे सह्याद्री अतिथिगृहात आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी गुंठेवारीबाबत लवकर निर्णय घेणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. बैठकीस विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, महसूल विभागाचे अति. सचिव, स्वाधीन क्षत्रिय सहसचिव एस. के. पाटणकर, नगर विकास सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ग्रामविकास अति. सचिव एस. एस. संधू, तसेच इतर संबंधित अधिकारी आणि सरपंच परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ग्रामपंचायतीस बांधकाम परवानगी व नोंदीचे अधिकार मिळणे, गावठाण हद्दवाढ, निवासी क्षेत्रवाढ, जुनी व नवी बांधकामे नियमित करणे, तुकडे बंदी कायदा रद्द करून ७/१२ नोंदी होणे, २०११ ची जनगणना निकष लागू करणे, स्वाधीन क्षत्रिय समितीच्या अहवालात दुरुस्ती वटहुकूम जारी करणे आदी विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी गावठाण हद्द १५०० मीटरने वाढविणे व २०११ ची जणगणना निकष लागू करण्याचे आदेश तत्काळ संबंधित सचिवांना दिले. तथापि, इतर प्रश्र्नांसंबंधी ताबडतोब अहवाल मंत्रिमंडळांच्या बैठकीपुढे सादर करण्याच्या सूचना दिल्याचे काकडे यांनी सांगितले.शिष्टमंडळामध्ये पुणे विकास मंचचे अध्यक्ष सदाअण्णा पवार, महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र नेवसे, सहसचिव सचिन सातव, कोषाध्यक्ष चंद्रहार चव्हाण, आव्हाळ वाडीचे सरपंच प्रवीण आव्हाळे, बगेरेचे सरपंच भाऊसाहेब मरगळे, जातेगावचे सरपंच समाधान डोके, पुणे विकासमंचचे गीताराम कदम, राजेंद्र दणके, अ‍ॅड. राजू राजूरकर, बाबासाहेब गलांडे, अ‍ॅड. पंडित कापरे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)