शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नवीन मतदारांना मिळणार घरपोच मतदार ओळखपत्र

By admin | Updated: January 26, 2017 00:03 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाने राबविलेल्या विशेष मतदार नावनोंदणी मोहिमेत जिल्ह्यात तब्बल ४ लाख नवीन मतदारांची नावनोंदणी झाली आहे.

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने राबविलेल्या विशेष मतदार नावनोंदणी मोहिमेत जिल्ह्यात तब्बल ४ लाख नवीन मतदारांची नावनोंदणी झाली आहे. या सर्व मतदारांना महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान चिठ्ठीचे (व्होटर स्लिप) वाटप करताना मतदार ओळखपत्राचे देखील वाटप करण्यात येणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान विशेष मतदार नाव नोंदणी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये नव्याने मतदार नाव नोंदणी करणे, पत्ता बदल करणे, नाव स्थलांतर करणे, मयत, दूबार व्यक्तींची नावे कमी करण्यासाठी अर्ज स्विकारण्यात आले. या विशेष मोहिमेमध्ये सर्वांधिक अर्ज नव्याने नाव नोंदणी व पत्ता बदल करण्यासाठीच आले. जिल्हा प्रशासनाने प्रथमच मोठ्या प्रमाणात १८ ते १९ वय असलेल्या नव मतदारांची नाव नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.यासाठी सर्व महाविद्यालयांमध्ये विशेष मोहिम घेऊन १८ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांकडून मतदार नाव नोंदणीसाठी अर्ज भरून घेण्यात आले. यामध्ये जिल्ह्यात तब्बल ४ लाखांपेक्षा अधिक मतदारांची नव्याने नोंदणी करण्यात आली. या सर्व मतदारांना महापालिका निवडणुकीपूर्वी मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ बुधावर (दि.२५) रोजी राष्ट्रीय मतदार दिना निमित्त काही मतदारांना ओळखपत्रांचे वाटप करून करण्यात आले आहे. (वार्ताहर)