पुण्यात १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार; धमकी देत जबरदस्तीने अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 09:19 IST2022-03-21T08:52:24+5:302022-03-21T09:19:41+5:30

नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार

neighbor rapes 14 year old girl in pune threatening coercion narhe pune crime news | पुण्यात १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार; धमकी देत जबरदस्तीने अत्याचार

पुण्यात १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार; धमकी देत जबरदस्तीने अत्याचार

धायरी: नऱ्हे येथील १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपीला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे परिसरात इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी आपल्या आई - वडिलांसोबत नऱ्हे भागात राहावयास आहे. तिच्या शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीला ती विश्वासाने काका म्हणायची. मुलीचे ऑनलाईन क्लास चालू असल्याने आई - वडिलांनी तिला मोबाईल दिला होता. त्यावेळी आरोपीने तिच्या मोबाईलवर मेसेज, धमक्या आणि लगड करून तिच्याशी जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध निर्माण केले. हा प्रकार सप्टेंबर २०२१ पासून सुरू होता. सिंहगड रस्ता पोलिसांनी याबाबत आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव करीत आहेत. 

'अशी' फुटली अत्याचाराला वाचा -
पिडीत मुलीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून शेजारीच राहत असणारा आरोपी तिच्या घरी जबरदस्तीने जायचा. मुलीला वारंवार होणारा मानसिक व शारीरिक त्रास सहन न झाल्याने तिने घडलेला प्रकार आपल्या आई - वडिलांना सांगितला. त्यानंतर ३-४ दिवसांपासून पीडित मुलीचे वडिलांना मानसिक धक्का बसल्याने ते कामावरच गेले नाही. म्हणून मालकाने त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता हा प्रकार त्यांना समजला. त्यांनी पुढाकार घेऊन सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Web Title: neighbor rapes 14 year old girl in pune threatening coercion narhe pune crime news