शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

घाट रस्त्यांचे सर्वेक्षण होण्याची गरज

By admin | Updated: July 29, 2015 00:13 IST

घाट रस्त्यावरून जाणा-या जड वाहनांमुळे रस्त्या लगतच्या दरडी कंपन पावतात. त्याच प्रमाणे काही वर्षांनंतर या दरडींना उन आणि पाऊसामुळे भेगा पडतात. तसेच खडकांमधील ‘जॉईट’

पुणे : घाट रस्त्यावरून जाणा-या जड वाहनांमुळे रस्त्या लगतच्या दरडी कंपन पावतात. त्याच प्रमाणे काही वर्षांनंतर या दरडींना उन आणि पाऊसामुळे भेगा पडतात. तसेच खडकांमधील ‘जॉईट’ कालांतराने वेगळे होत जातात होत जातात. त्यामुळे राज्यातील सर्वच घाट रस्त्याचे सर्वेक्षण केले आणि त्याचा सखोल अभ्यास करून त्यावरील उपाययोजना केल्या तर दरड कोसळून होणारे अपघात टाळता येतील,या संदर्भातील अहवाल भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागातर्फे (जीएसआय)राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. पुणे मुंबई महामार्गावर आडोशी बोगद्या जवळ दरड कोसळून झालेल्या अपघाताची पाहणी जीएसआयचे भुस्खलन विभागाचे संचालक डॉ. मकरंद बोडसे केली होती. कोणत्या कारणामुळे दरड कोसळली, या पुढील काळात अशा दरडी कोसळू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. महामार्गावरील काही भागात दरड कोसळण्याची शक्यता आल्याने सध्या त्यादृष्टीने डागडुजीचे काम केले जात आहे. रस्त्यावर दरड कोसळू नये,यासाठी शासनाने कोणत्या उपाय योजना कराव्यात याबाबत बोडसे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.केवळ आडोशी बोगद्या जवळ झालेल्या अपघाताकडे पाहून चालणार नाही. तर राज्यातील सर्वच रस्त्यांचा या निमित्ताने विचार झाला पाहिजे, असे नमूद करून बोडसे म्हणाले, घाट रस्त्यांवर दरडी कोसळू नये म्हणूनच तेथे जाळ्या बसविल्या जातात. परंतु, रस्त्यालगत बसविलेल्या जाणा-या जाळ्यांची डिझाईन, त्यांची क्षमता यांचाही करायला हवा. जड वाहनांमुळे सतत कंपन बसून दरडींमधील भेगा वाढत जातात. त्यात पावसाचे पाणी गेल्याने मातीचा आणि दगडाचा ढीगारा रस्त्यावर कोसळतो. जाळ्या मातीचा किती टन बोजा सांभाळू शकतात, त्या किती वर्षांनी बदलणे अपेक्षित आहे, याची तपासणी व्हायला हवी. (प्रतिनिधी)