शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नवी राजकीय व्यवस्था हवी

By admin | Updated: January 23, 2017 03:08 IST

समाजवादी सरकारवर टीका खूप करतात, पण परिवर्तनाचे काम कोण करणार? आपल्या विचारांचे सरकार कधी येणार, याची

पुणे : समाजवादी सरकारवर टीका खूप करतात, पण परिवर्तनाचे काम कोण करणार? आपल्या विचारांचे सरकार कधी येणार, याची वाट न पाहता नव्या राजकीय व्यवस्थेसाठी जनतेचा सहभाग घ्या, संघर्ष करा, सरकारवर दबाव आणणारी ताकद व्हा, असा संदेश ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. जी. जी. पारिख यांनी रविवारी येथे दिला. अखिल भारतीय समाजवादी युवा संमेलनाच्या समारोपामध्ये अध्यक्षपदावरून ते बोलत होते. येथील सानेगुरुजी स्मारकाच्या परिसरात दोन दिवस सुरू असलेल्या संमेलनामध्ये नवे समाजवादी युवा पथक निर्माण करण्याचा निश्चय झाला. आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणीय संकटांच्या विविध पैलूंवर देशभरातील आघाडीचे कार्यकर्ते, विचारवंत सहभागी झाले होते. समारोपाच्या सत्रामध्ये सोशॅलिस्ट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रेमसिंह, मध्य प्रदेशातील कार्यकर्ते डॉ. सुनीलम, समाजवादी नेते डॉ. अभिजित वैद्य, युसूफ मेहरअली युवा बिरादरीच्या गुड्डी व्यासपीठावर होत्या. देशभरातील ५९ संघटनांचे सुमारे ३०० प्रतिनिधी संमेलनासाठी उपस्थित होते.डॉ. प्रेमसिंह म्हणाले, ‘‘नवसाम्राज्यवादाचे अपत्य म्हणजे सध्याची हुकूमशाही. नवउदारमतवाद सुरूच राहिला, तर लोकशाही जिवंत राहणार नाही. लोकशाही संपविण्याचे प्रयत्न देशात गेल्या २५ वर्षांपासून सुरू आहेत. धर्मनिरपेक्ष पक्ष भाजपाला साथ देण्याचे वाढते प्रकार देशभर सुरू आहेत. अशा पक्षांना रोखण्याची जबाबदारी मुस्लिमांवर आहे.’’ डॉ. सुनीलम म्हणाले, ‘‘राष्ट्रसेवा दलाला ८२ वर्षांचा इतिहास आहे. समाजवादी व्यासपीठाच्या स्थापनेच्या वेळी जयप्रकाश नारायण यांच्यापासून अरुणा असफअलीपर्यंत १०० युवक होते. आज नवी सुरुवात करताना ३०० कार्यकर्ते एकत्र आले आहेत, ते खूप काही करू शकतात. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार यांच्याविरुद्ध लढण्याचा संकल्प करून युवकांनी स्वत:चे समाजवादीपण सिद्ध क रावे.’’डॉ. वैद्य म्हणाले, ‘‘समाजवादाला आधुनिक स्वरूप देण्याची गरज आहे. आजपर्यंत राष्ट्र सेवा दल कार्यकर्ते तयार करत राहिले आणि बाहेर जाऊन कार्यकर्ते वेगवेगळी बिरादरी तयार करीत राहिले. लोकतांत्रिक समाजवादाची प्रक्रिया चालविणाऱ्या पक्षांमध्ये कार्यकर्त्यांनी राहिले पाहिजे. उजव्या विचारधारेचे राजकारण रोखण्याची ताकद याच समाजवादी विचारधारेत आहे.’’ गुड्डी यांनी सूत्रसंचालन केले. भाषणांदरम्यान जुल्मी जब जब जुल्म करेगा सत्ता के हथियारोंसे, चप्पा चप्पा गुंज उठेगा आझादी के नारोंसे अशा घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले होते.