शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या माजी आमदारांमध्ये बाचाबाची

By admin | Updated: January 21, 2015 23:07 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करताना माजी आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली़ दोन माजी आमदारांमधील ही चकमकच चर्चेचा विषय ठरली़

रांजणगाव गणपती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करताना माजी आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली़ दोन माजी आमदारांमधील ही चकमकच चर्चेचा विषय ठरली़ शिरुर हवेली मतदार संघातील पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवाची कारणमिमांसा करताना पोपटराव गावडे यांनी सांगितले, की जानकर फॅक्टरमुळे पराभव झाला असता तर आंबेगावमध्ये हा फॅक्टर का नाही?़ प्रचाराचे नियोजन चांगले नव्हते़ मतदारसंघात आपल्याला प्रचाराला बोलवले नाही़ नियोजनबद्ध प्रचार केला असता तर चित्र वेगळे दिसले असते़ त्यांच्या या मुद्द्याला अशोक पवार यांनी आक्षेप घेतला़ त्यावरुन दोन्ही माजी आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली़ जिल्हाध्यक्ष व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा प्रकार सुरु होता़ शेवटी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, जालिंदर कामठे, बाळासाहेब नरके यांनी हस्तक्षेप करुन दोघांमधील ही बाचाबाची थांबविली़ या वेळी सूर्यकांत पलांडे यांनी आताचे सरकार शेतकरीविरोधी असून त्यांनी फकत अच्छे दिनाचे स्वप्न दाखविले. तर अशोक पवार यांनी मागचे झाले गेले विसरुन जाऊन पक्षाचे सर्वेसर्वा शरदराव पवार,अजितदादा पवार,खासदार सुप्रिया सुळे यांच्या व पक्षाच्या विचारांची बांधिलकी मानून कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे आगामी सर्व निवडणुका पक्षाच्या नावाने व साहेबांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जाणार असून कोणीही आत बाहेर करु नये असेही सांगण्यास ते विसरले नाहीत. यावेळी बाळासाहेब नरके,मंगलदास बांदल,राजेंद्र कोरेकर, डॉ.वर्षा शिवले यासंह अनेकांनी पक्षाच्या मेळाव्यात आपले विचार मांडले तर काहींनी विचार मांडतांना एकमेकांची उनीधुनी काढण्याची संधी सोडली नाही.दोन माजी आमदारमध्ये झालेली शाब्दिक चकमक चर्चेचा विषय ठरली तर या बाबत बाळासाहेब नरके यांनी हा पक्षांर्गत विषय असून तो पक्षीय पातळीवर तो संपविला आहे असे सांगितले. या वेळी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, अ‍ॅड.अशोक पवार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब नरके, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती मंगलदास बांदल,पीडीसीसी बँकेचे संचालक निवृत्तीआण्णा गवारे, भिमाशंकर सा. कारखान्याचे संचालक प्रदिप वळसेपाटील, जिल्हा युवक अध्यक्ष राजेंद्र कोरेकर, तालुकाध्यक्ष संतोष रणदिवे, महिलाध्यक्षाडॉ. वर्षा शिवले, पंचायत समिती सभापती सिध्दार्थ कदम, बाजार समितीचे उपसभापती मानसिंग पाचुंदकर, जि.प.सदस्य नंदकुमार पिग्ांळे, मनिषा कोरेकर, पांडुरंग थोरात, अ‍ॅड रंगनाथ थोरात तसेच आजी माजी पदाधिकारी, जि.प.सदस्य, प. स.सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)