शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा गजर

By admin | Updated: January 20, 2015 00:56 IST

महंमदवाडी प्रभाग क्र. ४५ मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ९ हजार २५२ अशा भरघोस मतांनी विजयी झाला.

हडपसर : महंमदवाडी प्रभाग क्र. ४५ मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ९ हजार २५२ अशा भरघोस मतांनी विजयी झाला. अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यातील गडावर राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर झाला आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले. शिवसेना-भाजपाचा धुव्वा, तर काँग्रेसची अनामत जप्त झाली.राष्ट्रवादी काँग्रेसचे फारूख इनामदार यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र निवडणूक अधिकारी ज्ञानेश्वर मोळक यांच्या हस्ते देण्यात आले. या प्रसंगी हडपसर विधानसभा मतदारसंघ हडपसरचे अध्यक्ष मंगेश तुपे, चेतन तुपे, माजी महापौर वैशाली बनकर, सुनील बनकर, प्रदीप मगर, डॉ. शंतनू जगदाळे उपस्थित होते.या निवडणुकीमध्ये प्रमुख पक्षाबरोबर स्थानिक अपक्ष असे पाच उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे फारूख इनामदार- ९ हजार २५२, शिवसेनेचे जयसिंंग भानगिरे ६ हजार ८६५, अपक्ष संजय घुले ५ हजार ४१, भाजपाचे जीवन जाधव ३ हजार २४, तर काँग्रेसचे वैभव डांगमाळी यांना अवघी ७४८ मते मिळाली.पहिल्या २ फेऱ्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराने आघाडी मिळविली, तर तिसऱ्या फेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली. शिवसेनेच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची, तर अपक्ष उमेदवार तिसरा आणि भाजपाचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर राहिले. काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने मात्र माजी आमदार बाळासाहेब शिवरकर यांनी विधानसभेत पाचवा क्रमांक राखला तोच पाचवा क्रमांक राखण्याची परंपरा कायम राखली; त्यामुळे त्याची अनामत रक्कमही जप्त झाली आहे.‘अच्छे दिन आनेवाले हैं’ हा फॅक्टर चालला नाही. त्यामुळे भाजपाची हवा गुल झाली. आजी आमदारांच्या कारकिर्दीतील त्याच्या विधानसभा मतदारसंघातील ही पहिली निवडणूक होती. त्यात त्यांना मोठा झटका बसला आहे. आजी-माजी नगरसेवक आणि आमदारांनाही मतदारांनी स्पष्ट नाकारल्याचे दिसून आले आहे. (वार्ताहर)वाहतूककोंडी सोडविण्याबरोबर भुयारी मार्गाचे काम पहिल्यांदा तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल. तसेच या परिसरात मोकाट जनावरांबरोबर डुकरांचा मोठा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागतो, त्यांचाही बंदोबस्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरील दादागिरी आणि गुंडगिरी मोडून काढण्यासाठी मतदारांनी मतदान केले आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही. प्रभागाचा विशेष विकास केला जाईल. पाणीप्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.- फारूख इनामदार, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस