Raksha Bandhan 2020: रोहित पवारांचं अनोखं रक्षाबंधन, कोरोना वॉरिअर्स बहिणींची घेतली खास भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 12:36 PM2020-08-03T12:36:43+5:302020-08-03T12:48:03+5:30

देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील यंदा अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.

ncp rohit pawar special raksha bandhan celebration with nurse | Raksha Bandhan 2020: रोहित पवारांचं अनोखं रक्षाबंधन, कोरोना वॉरिअर्स बहिणींची घेतली खास भेट

Raksha Bandhan 2020: रोहित पवारांचं अनोखं रक्षाबंधन, कोरोना वॉरिअर्स बहिणींची घेतली खास भेट

Next

पुणे - 'रक्षाबंधन' हा बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा सण. बहीण भावाच्या नात्यातील गोडवा कायम राहण्यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील यंदा अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरं केलं आहे. कोरोनाच्या लढ्यात वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. रुग्णांची सेवा करत आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने रोहित पवार यांनी कोरोना वॉरिअर्स बहिणींची खास भेट घेतली.

रोहित पवार यांनी आज पुण्यातील ससून आणि नायडू रुग्णालयांना भेट दिली आणि रुग्णालयातील नर्ससोबत रक्षाबंधन साजरं केलं आहे. सणांवर देखील कोरोनाचं सावट आहे. असा परिस्थितीत लोकांचा जीव वाचवण्यासाठी कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय सेवेतील बहिणींकडून रोहित पवार यांनी राखी बांधून घेतली आहे. "आपल्या अनेक भगिनी राज्यभरात कोविड योद्धे म्हणून काम करतात. त्यांच्या रक्षणाची जबाबदारी भाऊ म्हणून आपल्या सर्वांची आहे. त्यामुळं आज प्रतिनिधीक स्वरूपात ससून आणि नायडू हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्ये काम करणाऱ्या नर्सेस भगिनींच्या हातून राखी बांधून घेतली" असं ट्विट ही रोहित पवार यांनी केलं आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महाराष्ट्राच्या जनतेला 'रक्षाबंधन' सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. "कोरोना काळात अनेक महिला डॉक्टर,नर्स,पॅरामेडिकल स्टाफ,सफाई कर्मचारी,अंगणवाडी ताई,आशा ताई,महिला पोलीस असा मोठा भगिनीवर्ग जीवाची जोखीम पत्करुन समाजातील इतर भावांच्या रक्षणासाठी लढत आहे.त्यांच्या शौर्य,त्याग,समर्पणाबद्दल आज,रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी कृतज्ञ राहिलं पाहिजे" असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Sushant Singh Rajput Case: 'पालिका आणि पोलिसांना वेड लागलं वाटतं'; संजय निरुपम यांचा हल्लाबोल

CoronaVirus News : धक्कादायक! टेस्ट केल्यानंतर 'या' शहरात गायब झाले 2290 कोरोना पॉझिटिव्ह, परिसरात खळबळ

Video - ...अन् पाकिस्तानी न्यूज चॅनलवर अचानक फडकला भारताचा झेंडा

Sushant Singh Rajput Case: मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला BMCने जबरदस्तीने केलं क्वारंटाईन, बिहार पोलिसांचा आरोप

CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात 9,509 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 4 लाखांवर

CoronaVirus News : भारीच! प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तरुणांचा पुढाकार, रिक्षा सॅनिटायझेशन यंत्र केलं तयार

Web Title: ncp rohit pawar special raksha bandhan celebration with nurse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.