शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हवेलीत तिरंगी लढतीत राष्ट्रवादीने मारली बाजी

By admin | Updated: March 15, 2017 03:20 IST

हवेली पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून राष्ट्रवादीच्या वैशाली गणेश

लोणी काळभोर : हवेली पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून राष्ट्रवादीच्या वैशाली गणेश महाडीक यांची सभापतीपदी तर अजिंक्य सुरेश घुले यांची उपसभापदी निवड झाली.हवेली पंचायत समितीचे २६ सदस्य असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १३, भारतीय जनता पक्षाचे ६, तर शिवसेनेचे ५ व २ अपक्ष असे पक्षीय बलाबल झाले होते. त्रिशंकू अवस्थेत बाजी मारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला एकाची साथ मिळणे आवश्यक होते. ती कमतरता लोणी काळभोर गणातून अपक्ष निवडून आलेले उमेदवार युगंधर ऊर्फ सनी काळभोर यांनी सहयोगी सदस्यत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे भरून निघाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बहुमतात आहे. त्यामुळेच हवेलीचे सभापती व उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले.भारतीय जनता पक्षाचे कोंढवे धावडे गटातून निवडून आलेले भाजपाचेच बंडखोर उमेदवार बाळासाहेब मोकाशी यांनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेसमवेत युती करून सभापती व उपसभापतिपद हस्तगत करण्याचा प्रयत्न केला, परंतु, या निवडणुकीत शिवसेनेने दोन्ही ठिकाणी उमेदवार उभे करून भाजपाला कात्रजचा घाट दाखवल्याने भाजपाच्या मनसुब्यांवर पाणी पडले. पुणे येथील जुनी जिल्हा परिषदच्या महात्मा गांधी सभागृह येथे संपन्न झालेल्या या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून शहाजी पवार यांनी काम पाहिले तर त्यांना सहायक म्हणून हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ व संदीप कोहीनकर हे उपस्थित होते. सकाळी १० ते १२ या वेळेत इच्छुक उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे स्वीकारली. यामध्ये सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गण क्रमांक ७६ सोरतापवाडी गणातून निवडून आलेल्या वैशाली गणेश महाडीक, शिवसेनेच्या गण क्रमांक ८१ शिवणे गणातून निवडून आलेल्या उषा सुभाष नाणेकर तर भाजपाच्या गण क्रमांक ९३ मांगडेवाडी या गणातून निवडून आलेल्या सीमा संतोष पढेर यांनी तर उपसभापतिपदासाठी राष्ट्रवादीचे गण क्रमांक ८१ मांजरी बुद्रुक येथून निवडून आलले अजिंक्य सुरेश घुले, शिवसेनेचे गण क्रमांक ८५ येथून निवडून आलेले राजीव रामदास भाडाळे तर मांगडेवाडी गण क्रमांक ९३ मधून निवडून आलेले भाजपाचे अनिरुद्ध पंडित यादव यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली होती. दुपारी दोन वाजता सभेच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली. सुरुवातीला उपस्थित नवनिर्वाचित सदस्यांना दाखल करण्यात आलेली नामनिर्देशनपत्रे दाखवण्यात आली; त्यानंतर करण्यांत आलेल्या सर्व उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये कोणाचाही अर्ज बाद न झाल्याने दोन्ही पदांसाठी तिरंगी लढत होणार, हे स्पष्ट झाले होते. छाननीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटे वेळ देण्यात आला. विहीत वेळेत कोणीही माघार न घेतलेल्याने निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे निश्चित झाले होते. त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. एका पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असल्याने सवार्नुमते हात वर करून मतदान घेण्यात आले.प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. त्यावेळी एकून २६ मतदारांपैकी शिवसेनेचे वाघोली गण क्रमांक ७१ मधून निवडून आलेले सर्जेराव भिकाजी वाघमारे वगळता इतर सर्व २५ जण उपस्थित होते. यावेळी सभापतीपदासाठी झालेल्या मतदानांत राष्ट्रवादीच्या वैशाली महाडीक यांना १४, शिवसेनेच्या उषा नाणेकर यांना ६ तर भाजपाच्या सीमा पढेर यांना ५ मते पडली. तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे अजिंक्य घुले यांना १५, शिवसेनेचे राजीव भाडाळे यांना ४ तर भाजपाचे यादव यांना ६ मते पडली. (वार्ताहर)