शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

नानासाहेब गायकवाडच्या लॉकरमध्ये तब्ब्ल '१ कोटींचं सोनं अन् ५० लाख रोख'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 9:59 PM

गायकवाडची सर्व लॉकर्स ही पोलिसांच्या रडावरवर असून, पोलिसांकडून गायकवाडच्या केवळ दोनच लॉकरमधून कोट्यावधींचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे

ठळक मुद्देगायकवाडवर पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल

पुणे : नानासाहेब गायकवाडने सावकारी आणि बळजबरीने लुटलेल्या लोकांच्या जमिनीतून कमावलेला अफाट पैसा विविध लॉकरमध्ये दडवून ठेवल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. त्यांची सर्व लॉकर्स ही पोलिसांच्या रडावरवर असून, पोलिसांकडून गायकवाडच्या केवळ दोनच लॉकरमधून कोट्यावधींचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. त्यातील एका लॉकरमध्ये एक कोटी वीस लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या विटा, हि-यांचे दागिने, तर दुस-या लॉकरमध्ये पन्नास लाख रुपये रोख स्वरुपात पोलिसांनी जप्त केले आहेत.

मुख्य आरोपी नानासाहेब शंकरराव गायकवाड व गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड या पिता-पुत्रांवर खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी व जबर दुखापतीसाठी पळवून नेणे, दुखापत करणे, बेकादेशीरपणे जमाव जमविणे, कट रचून बनावटीकरण करून फसवणूक करणे, डांबून ठेवणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक अग्निशस्त्र बाळगणे, अवैधरित्या सावकारी करणे वगैरे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर डबल मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय नंदा नानासाहेब गायकवाड, सोनाली दीपक गवारे, (वय ४० वर्षे) दिपक निवृत्ती गवारे (वय ४५ वर्षे, दोघेही रा. शिवाजीनगर, पुणे), राजु दादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ (रा. सर्वोदय रेसिडेन्सी, ए विंग, फ्लॅट नं.२,विशालनगर, पिंपळे निलख, पुणे), सचिन गोविंद वाळके, संदीप गोविंद वाळके (दोघेही रा.विधाते वस्ती औंध पुणे) यांच्यावर देखील गुन्हादाखल करण्यात आले आहेत. वाळके बंधू अदयाप फरार आहेत.

आरोपींनी बेकायदेशीर मार्गाने स्वत:स व इतर साथीदारांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी पीडित व्यक्तींना अवैधरित्या व्याजाने पैसे देवून ते वसूल करण्यासाठी जबरदस्तीने जमिनीच्या मालकी बाबतचे दस्तऐवज, स्टॅम्प पेपर, लिहिलेल्या व को-या पेपरवर सहया व अंगठे घेणे अशा प्रकारच्या गुन्हे ते करत होते. त्यामध्ये व्याजाच्या व्यवसायातून लोकांच्या जागा व वाहने बळकावल्याची माहिती समोर येत असून, अशा व्यवहारातून मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी संपत्ती जमावल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांकडून गायकवाडांच्या लॉकर्सची झाडाझडती सुरू झाली असून, केवळ दोनच लॉकर्समध्ये कोट्यावधींचा खजिना सापडला असून, फिर्यादी महेश काटे यांच्याकडून बळजबरीने लिहून घेतलेली कागदपत्रे देखील सापडली आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीbusinessव्यवसाय