Join us  

IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?

सांघिक कामगिरीच्या जोरावर छाप पाडलेला कोलकाता संघ बाजी मारणार की, प्रतिस्पर्ध्यांना चोपणारा हैदराबाद विजयी ठरणार, हेच आता बघायचे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 5:46 AM

Open in App

रोहित नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क, चेन्नई : आयपीएलच्या १७व्या सत्राचे जेतेपद पटकावण्यासाठी रविवारी कोलकाता आणि हैदराबाद संघ एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर भिडतील. सांघिक कामगिरीच्या जोरावर छाप पाडलेला कोलकाता संघ बाजी मारणार की, प्रतिस्पर्ध्यांना चोपणारा हैदराबाद विजयी ठरणार, हेच आता बघायचे.

स्थळ : चेन्नई । संध्या. ७:३०

  • कोण, कधी विजेता?

कोलकाताने चौथ्यांदा, तर हैदरबादने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. कोलकाताने २०१२ व २०१४ साली जेतेपद पटकावले. २०२१ साली ते उपविजेते होते. हैदराबादने २०१६ ला जेतेपद, तर २०१८ ला उपविजेतेपद पटकावले.

  • पावसाची शक्यता!

शनिवारी चेन्नईमध्ये वातावरण ढगाळ होते. हवामान खात्याने सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तविली आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास सोमवारी लढत रंगेल.

कोलकाता नाईट रायडर्स

  • जमेची बाजू
  1. सुनील नरेन, रहमानुल्लाह गुरबाझ ही आक्रमक सलामी जोडी.
  2. नरेनसह रसेलचा अष्टपैलू खेळ.
  3. कर्णधार श्रेयस, व्यंकटेश, राणा, रिंकू सिंगमुळे मधली फळी मजबूत.
  4. मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्थी, राणा यांची दमदार गोलंदाजी.
  • कमजोर बाजू
  1. अतिआक्रमकतेच्या नादात नरेन स्वस्तात बाद होण्याची शक्यता. 
  2. श्रेयससह, गुरबाझ, नितिश राणा यांच्यातील सातत्याचा अभाव.
  3. मिचेल स्टार्क वगळता वेगवान गोलंदाजी प्रभावहीन.
  4. फिनिशर म्हणून रिंकू सिंगला फार संधी मिळाली नाही.

सनरायजर्स हैदराबाद

  • जमेची बाजू
  1. हेड, शर्मा यांची स्फोटक सलामी.
  2. हेन्रीच क्लासेन, एडेन मार्करम, राहुल त्रिपाठी यांच्या उपस्थितीत भक्कम मधली फळी.
  3. रेड्डी, शाहबाझ यांचा अष्टपैलू खेळ.
  4. पॅट कमिन्स, टी.नटराजन, भुवनेश्वर कुमार यांचा दमदार मारा.
  • कमजोर बाजू
  1. ट्रॅविस हेड, अभिषेक शर्मा लवकर बाद झाल्यास डाव अडचणीत येतो. 
  2. मधल्या फळीत केवळ हेन्रीच क्लासेन सातत्य राखण्यात यशस्वी. 
  3. धावांचा पाठलाग करताना फलंदाजी दडपणात ढेपाळते. 
  4. गोलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव.

 

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादकोलकाता नाईट रायडर्स