Join us  

१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 5:25 AM

मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकर सक्रिय होऊ शकते

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मान्सून प्रगतिपथावर असून निम्मे बंगाल उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भूभाग दोन मान्सूनने हिश्शाने काबीज केले आहे. मान्सूनचे आगमन ३१ मे दरम्यान केरळात तर १० जूनदरम्यान मुंबईसह कोकणात तर १५ जूनदरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भात होऊ शकते. मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकर सक्रिय होऊ शकते. तसे झाल्यास सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी व लगतच्या जिल्ह्यांत, मध्य महाराष्ट्र व खान्देशपेक्षा मान्सूनचे आगमन तेथे अगोदर होऊ शकते.

  1. महाराष्ट्रात मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दिवसाच्या उष्णतेबरोबर रात्रीचा उकाडाही अधिक जाणवेल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
  2. दुसरीकडे बंगाल उपसागरात तयार झालेले ‘रेमल’ नावाचे चक्रीवादळ २६ मेरोजी मध्यरात्री ताशी १३० ते १३५ किमी वेगाने बांगलादेश किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. 
  3. वादळासाठी ओमानने नाव सुचविले असून अरेबिक भाषेतील त्याचा अर्थ वाळू किंवा रेती होय. मान्सून वाटचालीवर तसेच महाराष्ट्रात सुरू असलेल्या उष्णता लाटसदृश्य स्थितीवर त्याचा विपरित परिणाम जाणवणार नाही.

 

टॅग्स :मुंबईपाऊसमहाराष्ट्रमोसमी पाऊस