शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्वरभास्कराला ‘अभिवादन’ करण्यासाठी सांगीतिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST

कार्यक्रम तीन सत्रात होणार असून, शनिवार दि. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळा ...

कार्यक्रम तीन सत्रात होणार असून, शनिवार दि. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. यानंतर सांगीतिक कार्यक्रमाला प्रारंभ होईल.

दुसरे सत्र रविवारी (दि. ७ फेब्रुवारी) सकाळी ९ ते १२ या वेळात रंगणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे या सत्रात संगीत क्षेत्राबाहेरील क्षेत्रातील प्रथितयश मान्यवर पंडितजींविषयी आठवणींना उजाळा देणार आहेत. यात ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, तंत्रज्ञ व प्रसिध्द लेखक अच्युत गोडबोले सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी लेखक, दिग्दर्शक व गीतकार श्रीरंग गोडबोले संवाद साधणार आहेत.

पंडितजींच्या देहावसानानंतर आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे त्यांच्यावर एका विशेष लघुपटाचीनिर्मिती करण्यात आली होती. हा लघुपट तिसऱ्या सत्रात (दि. ७ फेब्रुवारी) दाखविण्यात येणारआहे.

प्रत्येक सत्रातील गायन-वादनाच्या कार्यक्रमांमध्ये, ज्येष्ठ गायक पं. अजॉय चक्रवर्ती, किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पंडिता डॉ. प्रभा अत्रे, ज्येष्ठ सतार वादक उस्ताद शाहीद परवेज, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती, पंडितजींचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले त्यांचे शिष्य पं. उपेंद्र भट, आनंद भाटे, श्रीनिवास जोशी तसेच पंडितजींचा नातू विराज जोशी आदी कलाकार रसिकांपुढे आपली कला सादर करतील. कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असेल परंतु कार्यक्रमासाठी मोफत प्रवेशिका घेणे अनिवार्य असेल.