खूनप्रकरणी एकाला कोठडी

By Admin | Updated: May 29, 2014 05:04 IST2014-05-29T05:04:59+5:302014-05-29T05:04:59+5:30

मेहुण्याच्या खूनप्रकरणी नीलेश राजेंद्र कानपिळे (वय २२, रा. नांदेड, ता. हवेली, जि. पुणे) या आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.

The murderer stays in the house | खूनप्रकरणी एकाला कोठडी

खूनप्रकरणी एकाला कोठडी

तळेगाव दाभाडे : मेहुण्याच्या खूनप्रकरणी नीलेश राजेंद्र कानपिळे (वय २२, रा. नांदेड, ता. हवेली, जि. पुणे) या आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. बहिणीला नांदावयास नेत नाही, या कारणावरून नीलेश कानपिळे याने बेसबॉल स्टिकने मेहुण्याला सोमवारी जबर मारहाण केली होती. यामध्ये सचिन नारायण जंबूकर (वय ३२ रा. सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे) याचा मृत्यू झाला. नीलेश कानपिळे याला आज वडगाव न्यायालयापुढे हजर केले असता २ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या खूनप्रकरणातील नीलेशचा भाऊ पप्पू राजेंद्र कानपिळे (वय २७ रा. नांदेड, ता. हवेली), सागर अवसरे (रा. अवसरवाडी, ता. हवेली) व त्याचे दोन मित्र फरारी आहेत.(वार्ताहर)

Web Title: The murderer stays in the house