Pune Crime: शिवी दिल्याच्या रागातून नातेवाईकाचा गोळ्या झाडून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 16:34 IST2022-01-21T16:33:01+5:302022-01-21T16:34:20+5:30

राग मनात धरूनच आरोपी अविनाशने रोहनला घराबाहेर बोलावले...

murder of a relative out of anger for swearing maval by shooting pune crime news | Pune Crime: शिवी दिल्याच्या रागातून नातेवाईकाचा गोळ्या झाडून केला खून

Pune Crime: शिवी दिल्याच्या रागातून नातेवाईकाचा गोळ्या झाडून केला खून

पुणे: पुणे जिल्ह्यात मावळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका वीस वर्षीय तरुणाचा झटापटीत गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. आज (शुक्रवार) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव रोहन चंद्रकांत येवले (२०) आहे. आरोपी अविनाश शिवाजी भोईर (२५) याने गोळी झाडल्याने रोहनचा मृत्यू झाला. अविनाश आणि रोहन दोघेही नातेवाईक आहेत. ते आढले खुर्द या गावात राहतात.

दोन दिवसांपूर्वी काही कारणांवरून त्या दोघांमध्ये वाद झाला होता. यामुळेच रोहनचा खून झाल्याचा संशय पिंपरी-चिंचवड पोलिसांना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन आणि अविनाश हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात दोन दिवसांपूर्वी मोठा वाद झाला होता. हे प्रकरण शिवीगाळ करण्यापर्यंत गेलं होतं. हा राग मनात धरूनच आरोपी अविनाशने रोहनला घराबाहेर बोलावले. नंतर शुक्रवारीही त्यांच्यात पुन्हा झटापट झाली.

दोन दिवसांपूर्वी शिवीगाळ केल्याच्या रागातून सोबत आणलेल्या पिस्तूलातून अविनाशने रोहनच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी रोहनच्या छातीच्या वर तर दुसरी गोळी दंडाला स्पर्श करून गेली. यानंतर घटनास्थळावरून अविनाशने पळ काढल्याची माहिती शिरगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिली आहे.

Web Title: murder of a relative out of anger for swearing maval by shooting pune crime news