कुख्यात गुन्हेगाराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:11 IST2021-01-21T04:11:40+5:302021-01-21T04:11:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कुख्यात गुन्हेगारावर सपासप वार करून त्याचा मृतदेह डुक्कर खिंडीतील पुलाखाली टाकून दिल्याचे आढळून आले. ...

The murder of a notorious criminal | कुख्यात गुन्हेगाराचा खून

कुख्यात गुन्हेगाराचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कुख्यात गुन्हेगारावर सपासप वार करून त्याचा मृतदेह डुक्कर खिंडीतील पुलाखाली टाकून दिल्याचे आढळून आले. ही घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली.

जग्या ऊर्फ जगदीश पारधे (वय १९, रा. म्हाडा कॉलनी, वारजे) असे खून झालेल्या या गुन्हेगाराचे नाव आहे. जगदीश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. मंगळवारी सकाळी दहा वाजता तरुण डुक्कर खिंडीतील पुलाखाली रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे नागरिकांनी पाहिले. ही माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. काही वेळात कोथरूड पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलीस माहिती घेत असतानाच तो मृतदेह जगदीश पारधे याचा असल्याची समजले. त्याच्या नातेवाईकांनी त्याला ओळखले.

याबाबत कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी सांगितले की, आज सकाळी डुक्कर खिंडीच्या पुलाखालील शिंदेवस्तीकडे जाणार्या रस्त्याच्या कडेला एकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी माहिती घेतल्यावर तो जगदीश पारधे याचा मृतदेह असल्याची ओळख पडली. त्याच्या गळ्यावर व्रण असून गालावर, नाकावर जखमा होत्या.

मंगळवारी रात्री ७ च्या सुमारास जग्या दारू पिऊन वस्तीत आला होता. त्यावेळी त्याची काही महिलांबरोबर भांडणे झाली होती. त्यानंतर तेथून तो निघून गेला होता. वस्तीत तो सर्वांना त्रास देत होता, त्यावरूनच त्याचा खून केला गेला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कोथरूड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The murder of a notorious criminal