अनैतिक संबंधातून खून; विवाहित महिलेच्या मुलाकडून प्रियकराची हत्या, आंबेगाव पोलिसांकडून दोघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:22 IST2026-05-11T12:20:23+5:302026-05-11T12:22:19+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, मयत दिपक क्षीरसागर यांचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधाला संबंधित महिलेच्या कुटुंबीयांचा विरोध होता. याच कारणा वरून झालेल्या वादातून महिलेच्या मुलाने दिपक यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केल्याची माहिती समोर येत आहे.

Murder due to immoral relationship Married woman's son kills lover, two arrested by Ambegaon police | अनैतिक संबंधातून खून; विवाहित महिलेच्या मुलाकडून प्रियकराची हत्या, आंबेगाव पोलिसांकडून दोघे ताब्यात

अनैतिक संबंधातून खून; विवाहित महिलेच्या मुलाकडून प्रियकराची हत्या, आंबेगाव पोलिसांकडून दोघे ताब्यात

धनकवडी : आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंद्रायणी नगर परिसरात रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिपक क्षीरसागर (वय ३७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत दिपक क्षीरसागर यांचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधाला संबंधित महिलेच्या कुटुंबीयांचा विरोध होता. याच कारणा वरून झालेल्या वादातून महिलेच्या मुलाने दिपक यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी सिद्धार्थ हातुरे आणि अनिकेत हातुरे या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदना साठी पाठविण्यात आला असून, खुनामागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण तपशील तपासातून स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे टेल्को कॉलनी परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास आंबेगाव पोलीस करत आहेत.

Web Title : अनैतिक संबंध बना जानलेवा: बेटे ने माँ के प्रेमी की हत्या की; गिरफ्तारियां

Web Summary : आंबेगांव में एक विवाहित महिला के साथ प्रेम संबंध के चलते दीपक क्षीरसागर की हत्या कर दी गई। महिला के बेटे ने कथित तौर पर रिश्ते से नाराज़ होकर क्षीरसागर को मार डाला। पुलिस ने दो संदिग्धों को गिरफ्तार किया है और मामले की जांच कर रही है।

Web Title : Affair Turns Deadly: Son Kills Mother's Lover; Arrests Made

Web Summary : In Ambegaon, a man, Deepak Kshirsagar, was murdered over an affair with a married woman. The woman's son, angered by the relationship, allegedly killed Kshirsagar. Police have arrested two suspects, Siddharth Hature and Aniket Hature, and are investigating the case to determine the exact motive.