शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटीसाठी आॅगस्टचा मुहूर्त

By admin | Updated: July 3, 2015 00:32 IST

औंध-रावेत बीआरटीएस प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. एक आॅगस्टपासून ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असेन, अशी माहिती आयुक्त राजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी : औंध-रावेत बीआरटीएस प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. एक आॅगस्टपासून ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असेन, अशी माहिती आयुक्त राजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. अनेक एजन्सी एकाच मार्गावर काम करीत असल्याने कामास विलंब होत असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. अनेक वेळा तारीख पे तारीख करूनही याबाबत हतबल असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसून आले. केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत सार्वजनिक वाहतूक सेवेचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने बीआरटीएस प्रकल्पाची घोषणा २००७मध्ये केली होती. त्यानंतर २००९ला त्याविषयीची कार्यवाही सुरू झाली होती. निगडी-पुणे हा मार्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा या मार्गाऐवजी रावेत-औंध हा मार्ग अगोदर सुरू करू, असे नियोजन करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून बीआरटी उद्घाटनाचे नियोजन केले जात होते. मात्र, तीन ते चार वेळा मुहूर्त बदलण्यात आले. महिनाभरापूर्वी १६ जुलै हा मुहूर्त काढण्यात आला. तोही मुहूर्त गाठू शकणार नसल्याचे दिसून येते. महापालिका अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात असणारा समन्वयाचा अभाव यामुळे याविषयीचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारच्या हॅलो पिंपरी-चिंचवडमध्ये प्रकाशित केले होते. बीआरटीला मुहूर्त सापडणार कधी? असा प्रश्न उपस्थित केला होता. आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयीचा खुलासा केला. (प्रतिनिधी)बीआरटीबाबत आयुक्त हतबलबीआरटीला मुहूर्त कधी लागणार, याविषयी आयुक्तांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, ‘‘रावेत-औंध हा मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या कामासाठी वेगवेगळ्या एजन्सी काम करीत आहेत. बसथांबे, टर्मिनलचे काम झाले आहे, टेक्निकल कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे विलंब होत आहे. पूर्वी महिन्यांनी उद्घाटन होईल, असे आम्ही सांगत होतो. ते आता दिवसांवर आले आहे. १६ जुलै तारीख समोर आहे. मात्र, अधिक वेळ लागला, तर एक आॅगस्टपासून हा मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न असेन. त्यानंतर दुसरा मार्ग सुरू होईल.’’ या विधानावरून आयुक्त हतबल असल्याचे दिसून येते.