शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संस्कृती मंडळाच्या बैठकीला मुहूर्त

By admin | Updated: September 14, 2015 04:44 IST

मधू मंगेश कर्णिक यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर साहित्य संस्कृती मंडळाचा कारभार जवळपास अडीच-तीन वर्षे ठप्पच होता.

पुणे : मधू मंगेश कर्णिक यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर साहित्य संस्कृती मंडळाचा कारभार जवळपास अडीच-तीन वर्षे ठप्पच होता. राज्य शासनाने मंडळाची पुनर्रचना केल्यानंतर बैठकीलाही मुहूर्त मिळाला असून, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या महाराष्ट्राबाहेरील संस्थांनाही अनुदान मिळण्यासाठी विचार झाला.मधू मंगेश कर्णिक यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर या मंडळाची राज्य शासनाने पुनर्रचनाच केली नव्हती. त्यामुळे अडीच-तीन वर्षे मंडळाचे कामकाज ठप्प होते. मंडळाच्या अध्यक्षपदी बाबा भांड यांची नियुक्ती करून समितीचीही पुनर्रचना करण्यात आल्यानंतर मंडळाची पहिली बैठक मुंबईत झाली. दर तीन महिन्यांनी मंडळाची बैठक घेण्याची तयारीही या बैठकीत दर्शविण्यात आली.विश्व कोष मंडळ, साहित्य संस्कृती मंडळ, मराठी राज्य विकास संस्था, मराठी भाषा सल्लागार समिती महाराष्ट्रात कार्यरत आहे. प्रत्येक संस्थेचे कामकाज ठरलेले आहे. या संस्थांमध्ये जे कामकाज चालते त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्या दृष्टीने धोरण ठरविण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. पहिली बैठक असली, तरी काही धोरणात्मक निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत. इंग्रजी ग्रंथांना पुरस्कार दिले जावे, क्रीडा विभागासाठी स्वतंत्र पुरस्कार असावा, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा सत्कार करण्यात यावा, या दृष्टीने चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)